चालताना ........

चालताना...

चालताना हा किती बघ घाम येतो
होतहोता शेवटी मुक्काम येतो

ठाम ज्याचे बोलणे आहे तयाचा
बोलताना शब्द ही मग ठाम येतो

वाटते जे व्यर्थ तेही बाळगावे
व्यर्थ जाता मोहराही काम येतो

सार्‍यांस निरोप त्याचा पोचतो पण,
ना इथे पत्र ,ना कुणास सलाम येतो

सापडेना राधिका आता कुठे ती
ना कुठे नजरेस आता शाम येतो

ना अता वाली कुणी समजू नये तू
आजही धावून तो 'श्रीराम' येतो

निलेश कालुवाला.

गझल: 

प्रतिसाद

ठाम ज्याचे बोलणे आहे तयाचा
बोलताना शब्द ही मग ठाम येतो

छान द्विपदी...

सार्‍यांस निरोप त्याचा पोचतो पण,
ना इथे पत्र ,ना कुणास सलाम येतो

या द्विपदीतील वृत्त चुकले आहे...

डॉ.कैलास

सापडेना राधिका आता कुठे ती
ना कुठे नजरेस आता शाम येतो

ना अता वाली कुणी समजू नये तू
आजही धावून तो 'श्रीराम' येतो

मार्मिक!
पुलेशु.

मा.कैलासजी,
अभिप्रायाबद्दल आभार.चूक दाखविल्याबद्दल अधिक आभार.

मा. अजयजी ,
आपलेही मनापासून आभार . गझलेच्या वाटेवर नुकताच पाऊल टाकले आहे. आपणा सर्वांचे मार्गदर्शन मोलाचे ठरावे.

निलेश.

मा.कैलासजी,
अभिप्रायाबद्दल आभार.चूक दाखविल्याबद्दल अधिक आभार.

मा. अजयजी ,
आपलेही मनापासून आभार . गझलेच्या वाटेवर नुकताच पाऊल टाकले आहे. आपणा सर्वांचे मार्गदर्शन मोलाचे ठरावे.