छोट्या बहराची गझल

(कमीत कमी बहराची गझल करावी असा विचार एकदा डोक्यात आला आणि एक प्रयत्न केलाय...)

चोर आहे?
थोर आहे!

पूर्ण होता -
कोर आहे

बस जिभेतच
जोर आहे!

ओठ - पिकले
बोर आहे!

शांततेचा
शोर आहे

प्रेत आणि
दोर आहे

ही गझल ना?
घोर आहे!

नचिकेत जोशी

गझल: 

प्रतिसाद

छान आहे. एवढ्या छोट्या वृत्तातली गझल विरंगुळा म्हणून ठीक.

बस जिभेतच
जोर आहे!

ओठ - पिकले
बोर आहे!

-आवडलेले शेर!

चोर आहे?
थोर आहे!
वा! छान.
बाकी चित्तरंजनशी सहमत. इतक्या छोट्या वृत्तात निभावणे तसे अवघडच.

चित्तजी, हबा, अजयजी - धन्यवाद...
एक प्रयत्न करून पाहिला... :-)