चढलेल्यांना निम्मा करतो

सांगत फिरतो जो सूर्याचा चुम्मा करतो
जरा भाजल्यावर का इतके यम्मा करतो ?

नाव ओळखीचे दिसता लपलेले येती
एक नाचतो, दुसरा छम्मा छम्मा करतो

ऐकवली बैलास गझल अन् बरे वाटले
कळो ना कळो, निदान थोडे 'हम्मा' करतो

वात्सल्याचा अर्थ एक, उच्चार वेगळे
कोणी मम्मी, आई, कोणी अम्मा करतो

सहकार्याचे किती वाजले बिगुल तरीही
काम कुणाचे, श्रेय कुणी गटम्मा करतो

किती असू दे नाव, किती ओळख दुनियेची...
काळ नेहमी चढलेल्यांना निम्मा करतो

प्रेमपत्र वाचले आणि दुर्लक्षित केले
असाच तोरा संबंधास निकम्मा करतो

मनातून वाटते कशाला 'अजय' भेटला
तरी मिळवुनी हात उगाचच झिम्मा करतो

गझल: 

प्रतिसाद

संपूर्ण गझल आवडली...... मूड भन्नाट आहे.

मनातून वाटते कशाला 'अजय' भेटला
तरी मिळवुनी हात उगाचच झिम्मा करतो

ही द्विपदी फार आवडली.

डॉ.कैलास

वात्सल्याचा अर्थ एक, उच्चार वेगळे
कोणी मम्मी, आई, कोणी अम्मा करतो
छान. ही हझलसदृश वाटते आहे रचना.

ऐकवली बैलास गझल अन बरे वाटले - हा हा हा हा!

रचना तीक्ष्ण वाटत आहे. गटम्मा हे ग'ट्ट'म्मा असे हवे होते बहुधा!

शुभेच्छा!

प्रेमपत्र वाचले आणि दुर्लक्षित केले
असाच तोरा संबंधास निकम्मा करतो
अप्रतिम ओळ!!!

सादर विनोद :
ऐकवली बैलास गझल अन् बरे वाटले
कळो ना कळो, निदान थोडे 'हम्मा' करतो - हा हा हा हा हा हा हा!
आपल्या या गझलेचा ढंगच एवढा मिश्कील आहे की बरे वाटणारच. ऐकवून आपल्याला थोडे आणि ऐकुन बैलाला बरेच.

बेफिकीर,
तुमचे बरोबर आहे. टाईप करताना राहिले. गट्टम्मा असेच आहे.

चित्तरंजन,
हझलसदृश रचना वाटते. पण तशी संपूर्णपणे नाही आहे. माझी लिहिण्याची स्टाईल तशी असल्याने वाटणे संभव आहे आणि काफियाही तसाच सुचला. धन्यवाद.

कैलास,
धन्यवाद.

ह बा
तुम्हालाही बरे वाटले हे वाचून आनंद झाला. धन्यवाद.

अजय रावांची हि गझल वाचून '' शिवाजी जवरे''च्या ह्या गझलेची आठवण झाली....

हाय तोबा हाय अल्ला,काय हे अम्मा शबाना;
का बरे तू नेल्सनाचा,घेतला चुम्मा शबाना?

हा असा उघड्यावरी तू का उगी केला तमाशा;
खेळ ना पडद्यावरी फुगडी,कधी झिम्मा शबाना.

तू कुण्या धुंदीत केले थेर तेव्हा चुंबनाचे,
आज बाई पेटला संसार हा निम्मा शबाना.

नाझ होता ,फक्र होता आमच्या तहजीबचा गे,
नासवीला आमचा आता पुरा जुम्मा शबाना.

नेल्सनाची बात सोडा तो बिचारा वृद्ध आबा,
येउ दे अमुच्या नशिबी,एक तो लम्हा शबाना.

--डॉ.कैलास

कैलास,
जवरेंची गझल(?) दिल्याबद्दल धन्यवाद.

मात्र हे लिखाण 'शबाना'वर आधारीत आहे. 'लम्हा' असा चुकीचा काफिया आहे. (अर्थात त्यांची पाठराखण की मला विरोध करण्यासाठी कोणी 'स्वरकाफिया' बोलले तर निराळे.)
जवरेंनी ही रचना नेमकी गझल म्हणूनच लिहिली आहे का?

येस..
लम्हा हा चुकिचा काफिया आहे.
जवरेंनी '' हजल '' म्हटले आहे....पण हजलेने सुद्धा '' बाराखडी'' पाळायला हवीच.. नाही का?

शबाना-नेल्सोन च्या बहुचर्चित चुंबना नंतर जवरेंनी ही रचना रचली होति.

डॉ.कैलास