ऐकत नाही आता हे मन...
ऐकत नाही आता हे मन
रात्रंदिन केवळ आक्रंदन
कधीतरी मग संयम सुटतो
अवेळीच होते उद्दीपन
भूक लागते शरीरास, मग
कसली सीमा? कसले बंधन?
झाले बघ दोघेही मोठे
परस्परांचे करुनी खंडन!
सूट बूट अन टाय गळ्याला
तोंडावर कृत्रिम अभिवादन
जिकडेतिकडे मोठ्या वेण्या
स्वस्त जाहले का गंगावन?
आधी घालू शिव्या जगाला
नंतर करणे आहे वंदन
ह्यास म्हणावे खरी संस्कृती
सुगंध देतच झिजते चंदन
टाळ मला, पण जाणुन घे तू
माझे तुजवरचे अवलंबन
तुला पाहताक्षणीच झाली
माझी अवघी दृष्टी पावन
मधुघट कोठे ठरवू शकतो..
व्हावे कोणा कसे आकलन!!!
- अमोघ प्रभुदेसाई 'मधुघट'
गझल:
प्रतिसाद
कैलास
गुरु, 27/05/2010 - 14:01
Permalink
ह्यास म्हणावे खरी
ह्यास म्हणावे खरी संस्कृती
सुगंध देतच झिजते चंदन
टाळ मला, पण जाणुन घे तू
माझे तुजवरचे अवलंबन.............. यातील असहायता विलक्षण आहे.. व्वा.
ह्या द्विपदी खूप आवडल्या....
छान गझल
डॉ.कैलास
ह बा
गुरु, 27/05/2010 - 14:23
Permalink
संपुर्ण गझल आवडली.
संपुर्ण गझल आवडली.
अजय अनंत जोशी
गुरु, 27/05/2010 - 21:02
Permalink
ऐकत नाही आता हे मन रात्रंदिन
ऐकत नाही आता हे मन
रात्रंदिन केवळ आक्रंदन
बापरे!
कधीतरी मग संयम सुटतो
अवेळीच होते उद्दीपन
हा हा हा !
टाळ मला, पण जाणुन घे तू
माझे तुजवरचे अवलंबन
वा वा!
ज्ञानेश.
गुरु, 27/05/2010 - 23:59
Permalink
नो ऑफेन्स बरंका मधुघटा, पण
नो ऑफेन्स बरंका मधुघटा,
पण पहिले साडेतीन शेर वाचून एकदम हसू फुटले ! :)
मधुघट कोठे ठरवू शकतो..
व्हावे कोणा कसे आकलन!
हेच खरे !!
चंदन आणि अवलंबन हे चांगले शेर आहेत.
पुलेशु.
बेफिकीर
शुक्र, 28/05/2010 - 09:43
Permalink
झाले बघ दोघेही
झाले बघ दोघेही मोठे
परस्परांचे करुनी खंडन!
सूट बूट अन टाय गळ्याला
तोंडावर कृत्रिम अभिवादन
आधी घालू शिव्या जगाला
नंतर करणे आहे वंदन
हे शेर फार आवडले. अभिनंदन!
चित्तरंजन भट
शुक्र, 28/05/2010 - 15:26
Permalink
झाले बघ दोघेही
झाले बघ दोघेही मोठे
परस्परांचे करुनी खंडन!
सूट बूट अन टाय गळ्याला
तोंडावर कृत्रिम अभिवादन
आधी घालू शिव्या जगाला
नंतर करणे आहे वंदन
वरील शेर विशेष. एकंदर छान.