कुणाकुणाला जरी समजला, मला परंतू कळला नाही...
कुणाकुणाला जरी समजला, मला परंतू कळला नाही...
जुन्याच घटना कुणी कधीचे ,इथे तपासत बसले आहे
जुन्याप्रमाणे नवीन येथे ,कधी तरी का घडले आहे?
तसाच धुरळा, तशाच वाटा ,तशीच चिंता, गावी बाकी...
जिथून पक्का भरून पाया ,शहर नव्याने वसले आहे
खुशाल मोठा धरून दाणा, समोर बसली खारूताई
मिटून डोळे हळूच मागे, लबाड मांजर टपले आहे
मला पुरे भूतकाळ अपुला, खुणावती तुज सुंदर वाटा
तुलाच लाभो ,उद्यात जे जे, हवेहवेसे दडले आहे
रिमझिमणारे तुषार झेलुन..तहानलेली उरते माती..
विरून शपथा, सरून प्रीती तशीच आता उरले आहे
’तुझाच मी" अन ’तुझीच मी "च्या सुरूच त्यांच्या आणाभाका...
जरी मनाला असत्य आहे कुणीतरी हे.. कळले आहे..
कुणाकुणाला जरी समजला, मला परंतू कळला नाही...
हिशोब करते शिवाय त्याच्या कितीक माझे चुकले आहे..
-सोनाली जोशी
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
शुक्र, 28/05/2010 - 15:18
Permalink
वा! गझल चांगली झाली आहे. फार
वा! गझल चांगली झाली आहे. फार आवडली. 'खुणावती तुज' पेक्षा 'तुला खुणावी' केल्यास कानांना बरे वाटेल बहुधा. 'तुज' टाळता येईल आणि 'मला -तुला' ची गंमतही येईल.
एक दुरुस्ती:
वाटा अनेक असल्यामुळे खुणावतीच योग्य आहे. पण एकंदर मला काय म्हणायचे आहे ते कळले असावे.
बेफिकीर
गुरु, 27/05/2010 - 10:10
Permalink
सोनाली, आपल्या गझलांपैकी
सोनाली,
आपल्या गझलांपैकी सर्वोत्कृष्ट गझल असावी ही माझ्यामते! प्रत्येक शेर रसरशीत आशयाचा अन कोणताही शेर अनावश्यक वाटत नाही. लयबद्ध गझल! अभिनंदन! चित्तरंजन यांच्या सुचवणीशी सहमत! मात्र, अतिशय सुरेख गझल आहे सोनाली!
अभिनंदन!
अनंत ढवळे
गुरु, 27/05/2010 - 10:15
Permalink
मला पुरे भूतकाळ अपुला,
मला पुरे भूतकाळ अपुला, खुणावती तुज सुंदर वाटा
तुलाच लाभो ,उद्यात जे जे, हवेहवेसे दडले आहे
व्वा !
प्रणव.प्रि.प्र
गुरु, 27/05/2010 - 10:27
Permalink
सोनाली, गझल आवडली. अतिशय
सोनाली,
गझल आवडली. अतिशय चांगला प्रयत्न माझ्यामते. तरी अजून चांगले करता येईल असे वाटते.
आवडलेले शेर-
मला पुरे भूतकाळ अपुला, खुणावती तुज सुंदर वाटा
तुलाच लाभो ,उद्यात जे जे, हवेहवेसे दडले आहे
तसाच धुरळा, तशाच वाटा ,तशीच चिंता, गावी बाकी...
जिथून पक्का भरून पाया ,शहर नव्याने वसले आहे
हा तर फारच आवडला-
खुशाल मोठा धरून दाणा, समोर बसली खारूताई
मिटून डोळे हळूच मागे, लबाड मांजर टपले आहे
जीवन असेच असते. मृत्यूच्या छायेत... किंवा मृत्यू जीवनाच्या छायेत.
शुभेच्छा. अजून येऊ दे.
ह बा
गुरु, 27/05/2010 - 10:34
Permalink
रिमझिमणारे तुषार
रिमझिमणारे तुषार झेलुन..तहानलेली उरते माती..
विरून शपथा, सरून प्रीती तशीच आता उरले आहे
अल्टी!!!
प्रविण हटकर
गुरु, 27/05/2010 - 15:40
Permalink
चक्र पायात मी घेवुनी
चक्र पायात मी घेवुनी हिंडतो
ती कुठे ना कधी धावली पाहिजे
सोनाली जोशी
गुरु, 27/05/2010 - 18:35
Permalink
प्रतिसाद, सुचवणी आणि दखल
प्रतिसाद, सुचवणी आणि दखल घेतल्याबद्दल सर्वांचे आभार. प्रत्येक वेळी माझ्याकडून मी प्रामाणिक प्रयत्न करते. कधी भट्टी चांगली जमते अचानकः)
सोनाली
मिल्या
गुरु, 27/05/2010 - 18:39
Permalink
मस्त गझल सोनाली... खुशाल मोठा
मस्त गझल सोनाली...
खुशाल मोठा धरून दाणा, समोर बसली खारूताई
मिटून डोळे हळूच मागे, लबाड मांजर टपले आहे
मला पुरे भूतकाळ अपुला, खुणावती तुज सुंदर वाटा
तुलाच लाभो ,उद्यात जे जे, हवेहवेसे दडले आहे
>>> विशेष आवडलेले शेर...
अजय अनंत जोशी
गुरु, 27/05/2010 - 20:49
Permalink
मिटून डोळे हळूच मागे, लबाड
मिटून डोळे हळूच मागे, लबाड मांजर टपले आहे
वा वा! खरे आहे. मस्त.
खुणावती तुज= हे बरोबर जमले आहे. 'तुज' मुळे खटकण्याचे कारण नाही. ते मान्यताप्राप्त आहे. 'खुणावती तुज' हे लयबद्ध आहे.
तुलाच लाभो ,उद्यात जे जे, हवेहवेसे दडले आहे
सुंदर! 'उद्यात' फार छान.
चांगली गझल!
ज्ञानेश.
शुक्र, 28/05/2010 - 15:15
Permalink
सुंदर गझल ! सगळेच शेर खास
सुंदर गझल !
सगळेच शेर खास आहेत. खूप आवडली !
प्रदीप कुलकर्णी
शुक्र, 28/05/2010 - 17:58
Permalink
जुन्याच घटना कुणी कधीचे, इथे
जुन्याच घटना कुणी कधीचे, इथे तपासत बसले आहे
जुन्याप्रमाणे नवीन येथे, कधी तरी का घडले आहे?
- छान.
खुशाल मोठा धरून दाणा, समोर बसली खारूताई
मिटून डोळे हळूच मागे, लबाड मांजर टपले आहे
- फारच छान.
रिमझिमणारे तुषार झेलून.. तहानलेली उरते माती..
विरून शपथा, सरून प्रीती तशीच आता उरले आहे
- वा... वा...
’तुझाच मी" अन ’तुझीच मी "च्या सुरूच त्यांच्या आणाभाका...
जरी मनाला असत्य आहे कुणीतरी हे.. कळले आहे..
(असत्य आहे कुणीतरी, हे जरी मनाला कळले आहे.)
- चांगला
पुलस्ति
शनि, 29/05/2010 - 03:52
Permalink
वा! मस्तच गझल सोनली! मला मतला
वा! मस्तच गझल सोनली!
मला मतला आणि भूतकाळ हे शेर फार फार आवडले!!
आनंदयात्री
रवि, 30/05/2010 - 09:23
Permalink
मला पुरे भूतकाळ अपुला,
मला पुरे भूतकाळ अपुला, खुणावती तुज सुंदर वाटा
तुलाच लाभो ,उद्यात जे जे, हवेहवेसे दडले आहे
वावा!!!!
उशीरा वाचली.. :(
कवि सुहास
सोम, 31/05/2010 - 18:05
Permalink
मला पुरे भूतकाळ अपुला,
मला पुरे भूतकाळ अपुला, खुणावती तुज सुंदर वाटा
तुलाच लाभो ,उद्यात जे जे, हवेहवेसे दडले आहे
वावा!!!!
खूप आवडली !
केदार पाटणकर
बुध, 02/06/2010 - 13:19
Permalink
चांगली. आवडली. मतला खूप
चांगली.
आवडली.
मतला खूप आवडला.