थवा

कशाला पुन्हा वेगळाला हवा
तुलाही थवा अन मलाही थवा?

तुझे गीत भासे जसा सापळा
तुलाही हवा अन मलाही हवा!

चला घेउया ग्लास भरुनी पुन्हा
तुलाही दवा अन मलाही दवा!

कसा काय हा उभ्याने शहारा?
तुलाही नवा अन मलाही नवा?

चल लाच घे अन कंत्राट दे रे
तुलाही खवा अन मलाही खवा!

गझल: 

प्रतिसाद

कशाला पुन्हा वेगळाला हवा
तुलाही थवा अन मलाही थवा?

तुझे गीत भासे जसा सापळा
तुलाही हवा अन मलाही हवा!

चला घेउया ग्लास भरुनी पुन्हा
तुलाही दवा अन मलाही दवा!

सहज आणि सुंदर!!!

हं....

हे शेरही घ्या...
जगाला हवे नित्य पोहेच का?
उपीटास का सापडेना रवा ?

नसे भाजली आज पोळी कुठे
कुठे तापलेला दिसेना तवा...

सगळ्यांसाठी
प्रतिसाद देताना तारतम्य बाळगावे, ही विनंती. गझल चारी बाजूंनी बहरून येण्यास मदत होईल, असेच ते असावेत. गझल हा काव्यप्रकार अधिकाधिक सशक्त, सुदृढ व्हावा, यासाठी आहे त्या ठिकाणाहून चार पावले पुढे नेण्यासाठी प्रतिसादांचा उपयोग व्हावा, असा उद्देश मनात ठेवूनच प्रतिसाद द्यावेत.

मनीषाताई, भुजंगप्रयात वृत्त खूपच सहजसुंदर आहे. ही रचना छान झालेय...
पण शेवटच्या दोन्ही शेरांच्या उला मिसर्‍यात वृत्तभंग झाला आहे. सुधारणा करावी.