उधाणलेला समुद्र....

उधाणलेला समुद्र, आपण पाहत असतो
खोल-खोल दु:खाने तो फेसाळत असतो

मोजत असशील तू ही लाटांमागुन लाटा
संथ किनारा असा न केव्हा जागत असतो

सोसुन दु:खे युगां-युगांची विसावण्यास्तव
किनार्‍याकडे एकसारखा धावत असतो

भीषण वादळ क्षणात देतो उठवुन तरिही
क्षितिजाशी तो किती दयेने वागत असतो

माझ्यामध्ये सुद्धा... एक समुद्रच आहे
वादळ घेवुन सदैव जो घोंगावत असतो

ह्रदयामधल्या आलेखाची नोंद असावी
ध्यास आपला किती-किती उंचावत असतो

-जनार्दन केशव म्हात्रे
म्हात्रे निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड,
कळवा-ठाणे ४००६०५. भ्रमणध्वनी: ९३२३५५५६८८

गझल: 

प्रतिसाद

सोसुन दु:खे युगां-युगांची विसावण्यास्त्व
किनार्‍याकडे एकसारखा धावत असतो
शेर आवडला!

मोजत असशील तू ही लाटांमागुन लाटा
संथ किनारा असा न केव्हा जागत असतो

हा शेर जरा संदिग्ध वाटला... बाकी गझल छानच.

म्हात्रे साहेब आपण बर्‍याच दिवसानंतर इथे आला आहात... अण्णा ( विनायक त्रिभुवन ) यांजकडून आपणा विषयी बर्‍याचदा ऐकले आहे. गझल प्रवासात कधीतरी.. कुठेतरी भेटूच.

डॉ.कैलास
९००४९३३७७३

माझ्यामध्ये सुद्धा... एक समुद्रच आहे
वादळ घेवुन सदैव जो घोंगावत असतो

ह्रदयामधल्या आलेखाची नोंद असावी
ध्यास आपला किती-किती उंचावत असतो
छान.

सोसुन दु:खे युगां-युगांची विसावण्यास्तव
किनार्‍याकडे एकसारखा धावत असतो

सही!
ह्रदयामधल्या आलेखाची नोंद असावी
ध्यास आपला किती-किती उंचावत असतो

उत्तम!
गझल आवडली.

ह. बा., डॉ.कैलास, अजय, क्रांती सर्वांना मनापासून धन्यवाद....