काळोख
काळोख
मी ओठ बंद केले दु:खास दाबण्याला !
प्रत्येक घाव बोले दु:खास सांगण्याला !
आरोप ठेवले का मजवर नवे नवे तू ?
झालो तुझा पुरेसे कैदेत ठेवण्याला !
मृत्युस समजलो मी आघात यातनांचे
जगणेच क्रूर होते हासून मारण्याला !
ते रंग फासलेले चेहरे हताश दिसती
का आरशात बघती स्वप्नास तारण्याला !
गर्दी जरी दिसेना मद्यालयात आता
गावात मान मोठा मद्यास प्राशण्याला !
लोकास दोष देता, अस्वस्थ तू न व्हावे
केलेच माफ मागे तुज वचन तोडण्याला !
हे शहर आज सारे अंधार होत आहे
अन सूर्यही उगवतो कळोख वाटण्याला !
प्रशांत वेळापुरे
पंढरपूर
गझल:
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
मंगळ, 18/05/2010 - 17:19
Permalink
वेगळी गझल आहे. मात्र, "चेहरे"
वेगळी गझल आहे.
मात्र, "चेहरे" बद्दल विचार करा (वृत्ताच्या बाबतीत).
गर्दी जरी दिसेना मद्यालयात आता... ??????
काय हो हे? रविवारी जमले तर कार्यक्रमाला या. सगळे गैरसमज दूर होतील..
दुसरी ओळ मात्र खरी...
शुभेच्छा!