जीवन तेंव्हा भिजत राहते
माझे दुखणे गझलांमधुनी निघत राहते
अश्रू होवुन जीवन तेंव्हा भिजत राहते
माणूस म्हणजे कधीच मजला कळला नाही
मनास माझ्या कोडे हल्ली छळत राहते
जखमांनाही किती वेदना होत असावी ?
थोडे थोडे दुखणे त्यांचे कळत राहते
मला हवे ते कधीच कोणा कळले नाही
नको नको ते मला सारखे मिळत राहते
नकोस येवू जवळी माझ्या,दूर निघुन जा
तिची सावली दिवसा-राती दिसत राहते
---------------दर्शन शहा
गझल:
प्रतिसाद
चक्रपाणि
शुक्र, 14/05/2010 - 23:08
Permalink
शेवटचे दोन शेर चांगले वाटले.
शेवटचे दोन शेर चांगले वाटले. जखमांची कल्पना चांगली वाटली, पण तितकीशी परिणामकारकपणे राबवता आली नाही; धूसरच राहिली, असे वाटले. चू.भू.द्या.घ्या.
अनंत ढवळे
रवि, 16/05/2010 - 18:09
Permalink
मला हवे ते कधीच कोणा कळले
मला हवे ते कधीच कोणा कळले नाही
नको नको ते मला सारखे मिळत राहते
चांगली कल्पना...
अजय अनंत जोशी
मंगळ, 18/05/2010 - 17:03
Permalink
मला हवे ते कधीच कोणा कळले
मला हवे ते कधीच कोणा कळले नाही
नको नको ते मला सारखे मिळत राहते
वा वा!
जखमांनाही किती वेदना होत असावी ?
छान!
माझे दुखणे गझलांमधुनी निघत राहते
अश्रू होवुन जीवन तेंव्हा भिजत राहते
कल्पना जुनी पण छान.
पण... दुसर्यांदा का भिजले हे कळले नाही.
मिल्या
सोम, 24/05/2010 - 00:06
Permalink
मला हवे ते कधीच कोणा कळले
मला हवे ते कधीच कोणा कळले नाही
नको नको ते मला सारखे मिळत राहते
चांगली कल्पना...
>>> हेच म्हणतो...
पुलेशु