फुलपाखरे
नाचवू नका फुलपाखरे
राबवू नका फुलपाखरे
झोप साखरी त्यांची असे
जागवू नका फुलपाखरे
पंख कापरी तुटतील ते
गाजवू नका फुलपाखरे
राहू दे जिथे हसतील ती
थांबवू नका फुलपाखरे
विश्वबाग ही त्यांचीच ना
पाठवू नका फुलपाखरे
- हणमंत शिंदे
गझल:
कसले माझे ? कुठले अपुले ? ते परकेच निघाले !
ज्यांनी धीर दिला , ते माझे कोण न जाणे होते ?
नाचवू नका फुलपाखरे
राबवू नका फुलपाखरे
झोप साखरी त्यांची असे
जागवू नका फुलपाखरे
पंख कापरी तुटतील ते
गाजवू नका फुलपाखरे
राहू दे जिथे हसतील ती
थांबवू नका फुलपाखरे
विश्वबाग ही त्यांचीच ना
पाठवू नका फुलपाखरे
- हणमंत शिंदे
प्रतिसाद
ह बा
शुक्र, 07/05/2010 - 12:07
Permalink
पहिली गझल आहे. जाणकारांनी
पहिली गझल आहे. जाणकारांनी मार्गद र्श न करावे ही अपेक्षा.
अजय अनंत जोशी
शनि, 08/05/2010 - 12:42
Permalink
ह बा काय कळलं नाई बा..!
ह बा
काय कळलं नाई बा..!
ह बा
शनि, 08/05/2010 - 13:01
Permalink
अजयजी बालकामगार आणि
अजयजी
बालकामगार आणि प्रसिध्दीसाठी कोवळ्या वयात अशक्य ताण पेलावा लागणारी मुले, भ्रुणहत्या इ.
धन्यवाद!
ह बा
शनि, 08/05/2010 - 17:44
Permalink
जोशी साहेब यमक जुळवण्याच्या
जोशी साहेब यमक जुळवण्याच्या मोहापाइ आपण मला 'बा' म्हणालात. रचना साँदर्यासाठी एवढा मोठा वयक्तिक त्याग नका करत जाऊ.
बालकामगार, रिअलिटी शोचा बळी ठरणारी मुले, भ्रूण हत्या इ. संद र्भाने लिहीलेली गझल आहे.
हबा.