तुला पाहतो...
तुला पाहतो...जणू पाहतो आरसाच मी!
किती किती भासतो स्वतःला वेगळाच मी!
अजून मजला साद घालती चुकार लाटा..
अजून आहे किनार्यावरी कोरडाच मी!
बदल तुझ्या नजरेतच बहुधा आहे झाला
नाहीतर हा तसाच आहे कालचाच मी!
जणू हरवलो सागरामध्ये गहिरनिळ्या..
फक्त तुझ्या डोळ्यांत पाहिले एकदाच मी!
चांदणराती क्षणभर येते याद तुझी, मग..
घाबरतो हे जाणवून की एकटाच मी!
चुंबनओल्या रात्री संपुन युगे लोटली
भिजतो अजुनी आठवांत त्या का उगाच मी?
गझल:
प्रतिसाद
कैलास
गुरु, 22/04/2010 - 11:18
Permalink
बदल तुझ्या नजरेतच बहुधा आहे
बदल तुझ्या नजरेतच बहुधा आहे झाला
नाहीतर हा तसाच आहे कालचाच मी!
जणू हरवलो सागरामध्ये गहिरनिळ्या..
फक्त तुझ्या डोळ्यांत पाहिले एकदाच मी!
व्वा...
हे दोन शेर खासच....
डॊ.कैलास
ज्ञानेश.
शुक्र, 23/04/2010 - 13:15
Permalink
बदल तुझ्या नजरेतच बहुधा आहे
बदल तुझ्या नजरेतच बहुधा आहे झाला
नाहीतर हा तसाच आहे कालचाच मी!
व्वा..!
चांदणराती क्षणभर येते याद तुझी, मग..
घाबरतो हे जाणवून की एकटाच मी!
छान.
गझल आवडली.
गंगाधर मुटे
शुक्र, 30/04/2010 - 22:53
Permalink
आवडली गझल.
आवडली गझल.
आनंदयात्री
शनि, 01/05/2010 - 22:06
Permalink
गझल आवडली...
गझल आवडली...
अजय अनंत जोशी
शनि, 08/05/2010 - 12:35
Permalink
बदल तुझ्या नजरेतच बहुधा आहे
बदल तुझ्या नजरेतच बहुधा आहे झाला
नाहीतर हा तसाच आहे कालचाच मी!
वा! व्वा! फारच सुंदर जमले आहे. मस्त.
ह बा
गुरु, 27/05/2010 - 19:22
Permalink
तुला पाहतो...जणू पाहतो आरसाच
तुला पाहतो...जणू पाहतो आरसाच मी!
किती किती भासतो स्वतःला वेगळाच मी!
खुपच छान!!!
बेफिकीर
शुक्र, 28/05/2010 - 09:55
Permalink
चांगली गझल मधुघट!
चांगली गझल मधुघट!
बेफिकीर
शुक्र, 28/05/2010 - 09:57
Permalink
चांगली गझल मधुघट!
चांगली गझल मधुघट!
मिल्या
सोम, 31/05/2010 - 16:46
Permalink
छान गझल मधुघट बदल तुझ्या
छान गझल मधुघट
बदल तुझ्या नजरेतच बहुधा आहे झाला
नाहीतर हा तसाच आहे कालचाच मी!
चांदणराती क्षणभर येते याद तुझी, मग..
घाबरतो हे जाणवून की एकटाच मी!
>>> सुरेख