विरह
झाला विरह अता मी, रडणार फक्त आहे
अश्रू मुळीच नाही, ढळणार रक्त आहे
बाहेर येउनी ना, दुःखास दर्शवावे
अश्रूंस पापण्यांची, ताकीद सक्त आहे
जाणीव पातकाची ,घडवी बदल असा की
सैतान कालचा तो , आता विरक्त आहे
आशेवरी जगावे, हे फक्त आठवावे
येणार जो उद्या तो, माझाच वक्त आहे
देउ कशी लढाई, निष्ठूर प्राक्तनाशी ?
दुबळे प्रयत्न माझे , अन ते सशक्त आहे
जो वागवी मनावर , जोखड तुझ्या मनाचे
'' कैल्या'' असेल ही तो, मी मात्र मुक्त आहे
( मक्त्यात अलामतीची सूट घेतली आहे )
डॉ. कैलास गायकवाड.
गझल:
प्रतिसाद
ज्ञानेश.
शुक्र, 23/04/2010 - 13:19
Permalink
छान आहे गझल. 'वक्त' हा हिंदी
छान आहे गझल.
'वक्त' हा हिंदी शब्द मात्र खटकला.
शुभेच्छा !
कैलास
शुक्र, 23/04/2010 - 13:51
Permalink
’”;वक्त’” हा सुटा हिंदि शब्द
’”;वक्त’” हा सुटा हिंदि शब्द आहे.... परंत ’”वक्तशीरपणा’ ’सारखे शब्द मराठीत प्रयोजिले जातात..... यास्तव ’ वक्त ’ हा शब्द वापरण्याचे धाडस केले आहे.परंतु तो खटकण्या जोगा आहे हे निश्चित.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
डॉ.कैलास
गंगाधर मुटे
शुक्र, 30/04/2010 - 22:52
Permalink
बाहेर येउनी ना, दुःखास
बाहेर येउनी ना, दुःखास दर्शवावे
अश्रूंस पापण्यांची, ताकीद सक्त आहे
अप्रतिम.
कैलास
शनि, 01/05/2010 - 14:30
Permalink
धन्यवाद गंगाधरजी डॉ.कैलास
धन्यवाद गंगाधरजी
डॉ.कैलास
काव्यरसिक
शनि, 01/05/2010 - 16:25
Permalink
सुंदर रचना. मला आवडली. खालील
सुंदर रचना.
मला आवडली.
खालील शेर विषेश भावले.
बाहेर येउनी ना, दुःखास दर्शवावे
अश्रूंस पापण्यांची, ताकीद सक्त आहे
देउ कशी लढाई, निष्ठूर प्राक्तनाशी ?
दुबळे प्रयत्न माझे , अन ते सशक्त आहे
--------------------------------------------नचिकेत भिंगार्डे
कैलास
शनि, 01/05/2010 - 18:32
Permalink
धन्यवाद काव्यरसिक....नचिकेत
धन्यवाद काव्यरसिक....नचिकेत भिंगार्डे.
डॉ.कैलास
अजय अनंत जोशी
शनि, 08/05/2010 - 12:41
Permalink
विषय चांगले असूनही फारशी
विषय चांगले असूनही फारशी फुलली नाही असे वाटते.
जसे....
देउ कशी लढाई, निष्ठूर प्राक्तनाशी ?
दुबळे प्रयत्न माझे , अन ते सशक्त आहे
असो. विषय आवडले. मांडणी आणि आशय अजून चांगले होतील आणि तुम्ही ते नक्की कराल.
धन्यवाद.
कैलास
शनि, 08/05/2010 - 14:24
Permalink
धन्यवाद अजयजी.... आपल्या
धन्यवाद अजयजी.... आपल्या शब्दांनी हुरुप येतो अन पुनश्च लिखाणाची प्रेरणा लाभते....
मनःपूर्वक धन्यवाद.
डॉ.कैलास
ह बा
गुरु, 27/05/2010 - 19:18
Permalink
बाहेर येउनी ना, दुःखास
बाहेर येउनी ना, दुःखास दर्शवावे
अश्रूंस पापण्यांची, ताकीद सक्त आहे
उत्क्रुष्ट शेर!!!
कैलास
शुक्र, 28/05/2010 - 13:42
Permalink
धन्यवाद ह.बा. डॉ.कैलास
धन्यवाद ह.बा.
डॉ.कैलास
प्रशान्त वेळापुरे
शुक्र, 28/05/2010 - 16:58
Permalink
जाणीव पातकाची ,घडवी बदल असा
जाणीव पातकाची ,घडवी बदल असा की
सैतान कालचा तो , आता विरक्त आहे
छान ! वयाबरोबर (कदाचित् पश्यातापाने )माणूस बदलतो म्हणतात,
प्रशांत
कैलास
शुक्र, 28/05/2010 - 20:08
Permalink
प्रशांतजी, वयाबरोबर असेलही...
प्रशांतजी,
वयाबरोबर असेलही... पण पापाच्या जाणिवेने... म्हण जेच पश्चात्तापाने विरक्ती येते....हे मला अभिप्रेत आहे.
खरे तर हा शेर '' वाल्याचा वाल्मीकी होतो '' यावर रचला आहे.
प्रतिसादाबद्दल आपले धन्यवाद.
डॉ.कैलास