नाटकी

***************************
***************************

मंत्रात गोठले साक्षात्कार नाटकी
दैवात गुंतलेले सुविचार नाटकी

आहेच मृत्युपंथी विवेक मानवाचा
धर्मास पोसणारे यल्गार नाटकी

कर्मास बांधलेले आयुष्य माग तू..
निर्जीव पत्थरांचे संस्कार नाटकी

घेऊन सात फेरे जगणे महान पण..
नेपथ्य देखणे अन उपचार नाटकी

दानात कुंडले अन युध्हात मातही
ग्रंथात नांदणारे अवतार नाटकी

रमला जरी इथे तू 'मैत्रेय' छानसा
बाजार नाटकी हे झंकार नाटकी

******************************
******************************
www.maitreyaa.wordpress.com

गझल: 

प्रतिसाद

रमला जरी इथे तू 'मैत्रेय' छानसा
बाजार नाटकी हे झंकार नाटकी

गझल आवडली...फक्त मक्ता मनाला भावला नाही.

डॉ.कैलास

आहेच मृत्युपंथी विवेक मानवाचा
धर्मास पोसणारे यल्गार नाटकी

छान आहे!

पहिले दोन शेर वाचताना जरासं अडखळायला होतंय.. बाकी उत्तम!

आहेच मृत्युपंथी विवेक मानवाचा ... ही ओळ जरा पुन्हा पहा.
धर्मास पोसणारे यल्गार नाटकी ... ही ओळ मस्त.
एकूण ठीक.

आवडली.

सुंदर. आवडली.