पंढरी

वदंता वाटते आता.. कहाणी जी खरी होती
कधीकाळी इथे प्रत्येक गावी पंढरी होती

तुझ्या माझ्यातले नाते जरासे वेगळे होते
जवळ होतो तरी.. दोघांमधे कायम दरी होती

तसा नव्हताच रस्ता वाकडा अन खाच-खळग्यांचा
अरे पायातली चप्पल.. जराशी चावरी होती

तुझ्या श्वासातले आव्हान इतके वादळी होते
किनारा सोडुनी नौका बुडाली सागरी होती

म्हणे येणार ती झुळकेप्रमाणे ऐकले होते
उडाली उंच आभाळी.. मनाची शेवरी होती

कुणी यावे कुणी जावे, कुणी मुक्काम ठोकावा
हृदय का धर्मशाळेतील पडकी ओसरी होती?

तुला सांगूनही कळलाच नाही अर्थ मौनाचा
तुला तर वाटले केली तुझी मी मस्करी होती

तुला भेटायला येईन का मी रिक्त हातांनी?
तुझ्यासाठीच मॄत्यो आणली मी भाकरी होती

गझल: 

प्रतिसाद

वा !
सुंदर गझल..!
मतला, चप्पल आणि शेवरी हे शेर खूपच छान वाटले.

"उडाली उंच आभाळी.. मनाची शेवरी होती" मस्तच!
चित्तरंजन यांचा शेर आठवला-
लाभली होतीस क्षणभर तू सुगंधासारखी,
हुंदडावे वाटले आजन्म वार्‍यासारखे !

म्हणे येणार ती झुळकेप्रमाणे ऐकले होते
उडाली उंच आभाळी.. मनाची शेवरी होती

कुणी यावे कुणी जावे, कुणी मुक्काम ठोकावा
हृदय का धर्मशाळेतील पडकी ओसरी होती?

क्या बात है!!!
वरील शेर खूप भावले...गझल आवडली.

कैल्या

तसा नव्हताच रस्ता वाकडा अन खाच-खळग्यांचा
अरे पायातली चप्पल.. जराशी चावरी होती

तुझ्या श्वासातले आव्हान इतके वादळी होते
किनारा सोडुनी नौका बुडाली सागरी होती

म्हणे येणार ती झुळकेप्रमाणे ऐकले होते
उडाली उंच आभाळी.. मनाची शेवरी होती

वाहव्वा!
वरचे तीन शेर क्लास झालेत!

तुला सांगूनही कळलाच नाही अर्थ मौनाचा
तुला तर वाटले केली तुझी मी मस्करी होती
हा शेर छान...!

वदंता वाटते आता.. कहाणी जी खरी होती
कधीकाळी इथे प्रत्येक गावी पंढरी होती

म्हणे येणार ती झुळकेप्रमाणे ऐकले होते
उडाली उंच आभाळी.. मनाची शेवरी होती

कुणी यावे कुणी जावे, कुणी मुक्काम ठोकावा
हृदय का धर्मशाळेतील पडकी ओसरी होती?

वा ! मस्त

म्हणे येणार ती झुळकेप्रमाणे ऐकले होते
उडाली उंच आभाळी.. मनाची शेवरी होती

वाव्वा! चावरी व ओसरीही मस्त. गझल चांगली झाली आहे. मथळा व मक्ता जरासा संदिग्ध वाटला. भाकरी म्हणजे काय?

भाकरी म्हणजे जीवन हा अर्थ अपेक्षित असावा.

डॉ.कैलास

सुंदर गझल....आपल्याकडून आधी ऐकली होती त्यामुळे वाचताना आपली युनिक स्टाईल कानात गुणगुणत होती!
फक्त एक शंका आली वाचताना....'म्हणे' आणि 'ऐकले होते' हे एकाच ओळीत जरा विचित्र वाटत नाहीत का? असे वापरण्याची पद्धत नसावी बहुतेक!

एक गुणी गझल मिलिंदराव! पहिले तीन शेर व इतर शेरांमधील सुट्टे मिसरे खूप आवडले.

धन्यवाद!

घडो वर्षाव प्रतिभे ’बेफ़िकिर’ ....... मक्ता जुळवताना
वियदगंगेमधे हल्ली मला... सुचते कुठे काही?

-'बेफिकीर'!

चांगली गझल. दरी, शेवरी, ओसरी खासच!

खुप आवडली. पंढरी, शेवरी, भाकरी आवडले.

पंढरी, शेवरी, भाकरी खासच.

उडाली उंच आभाळी.. मनाची शेवरी होती?????????
मन=शेवरी???
असंबध्द, अयोग्य उपमा आहे असे आपणासही वाटत असेलच ना?

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद...

चित्त : भाकरी उपमा कैलास म्हणतात त्याप्रमाणे स्वतःच्या जीवनालाच आहे... भूकबळी विषयी आहे शेर...

म्हणे येणार ती झुळकेप्रमाणे ऐकले होते
उडाली उंच आभाळी.. मनाची शेवरी होती

कुणी यावे कुणी जावे, कुणी मुक्काम ठोकावा
हृदय का धर्मशाळेतील पडकी ओसरी होती?

तुला भेटायला येईन का मी रिक्त हातांनी?
तुझ्यासाठीच मॄत्यो आणली मी भाकरी होती

छान .......! शुभेच्छा....!

शेवरी म्हणजे शेवरीचा कापूस अपेक्षित असावा....

डॉ.कैलास

शेवरी म्हणजे शेवरीचा कापूस अपेक्षित असावा....

डॉ.कैलासजी,

आपला तर्क आपणास योग्य वाटत असल्यास तो मलाही मान्य आहे.

शेवरीच्या झाडाला कापसा सारखि बोंडे येतात........ हवेने ह्या बोंडांतील कापुस आकाशात तरंगत रहातो....

म्हणे येणार ती झुळकेप्रमाणे ऐकले होते
उडाली उंच आभाळी.. मनाची शेवरी होती

ती येणार ही बातमी सुखद हवेच्या झुळुकेप्रमाणे आहे.... अन त्यामुळे मन शेवरीच्या कापसाप्रमाणे उंच आभाळात उडाले आहे..... हा मला कळालेला अर्थ आहे.

हवे असल्यास मी शेवरीच्या झाडाचा अन त्यास लागलेल्या कापसाच्या बोंडाचा फोटो पोस्ट करतो.

डॉ.कैलास

माफ करा अनंतजी.......
हबा आणि वामन यांस असलेल्या शंकेचे निरसन करण्यात ही चर्चा घडली.....
एकदा मिल्या यांनी सदर शेराचा ... किंबहुना शेवरीचा अर्थ दिला असता तर फार बरे झाले असते.

डॉ.कैलास

@डॉ.कैलास

शेवरीच्या झाडाला कापसा सारखि बोंडे येतात........ हवेने ह्या बोंडांतील कापुस आकाशात तरंगत रहातो....

म्हणे येणार ती झुळकेप्रमाणे ऐकले होते
उडाली उंच आभाळी.. मनाची शेवरी होती

ती येणार ही बातमी सुखद हवेच्या झुळुकेप्रमाणे आहे.... अन त्यामुळे मन शेवरीच्या कापसाप्रमाणे उंच आभाळात उडाले आहे..... हा मला कळालेला अर्थ आहे.

हवे असल्यास मी शेवरीच्या झाडाचा अन त्यास लागलेल्या कापसाच्या बोंडाचा फोटो पोस्ट करतो.

कैलासजी,
फोटोची आवश्यकता नाही. आपले स्पष्टीकरण पटले. असे असु शकते. धन्यवाद! शुभेच्छा!