गुन्हे

************************
************************

पुन्हा वाटते पुन्हा तू हसावे
गुन्हे नेटके पुन्हा तू करावे

'नको रे...नकोच रे' हाच धोषा
मला हे अमान्य सारे भुलावे

अरे आज मात्र हैदोस झाला
तिने टाकला लिफाफाच नांवे

कशाला उगाच चर्चा सुगंधी
तिला जर हवे फुलांशी दुरावे

इथे ना हवेचा तो बोलबाला
अचंबीत वस्त्या;संन्यस्त गावे

करावा असा परीपाठ आता
कुणाशी न वैर;'मैत्रेय' व्हावे

***********************
***********************

www.maitreyaa.wordpress.com

गझल: 

प्रतिसाद

गिरीश,
कशाला उगाच चर्चा सुगंधी
तिला जर हवे फुलांशी दुरावे
छान शेर..!

परंतु,
इथे ना हवेचा तो बोलबाला
अचंबीत वस्त्या;संन्यस्त गावे
या शेरात मात्रा जास्त आहेत असे वाटते.

ही गझलही भुजंगप्रयातात लिहून बघावी असे सुचवावेसे वाटते.