गलितगात्र
तू मर्द जीवना मी गाळून गात्र आहे
देण्या लढा तुझ्याशी आता न पात्र आहे
जिव्हा मुखात काळी आहे तुझ्या जरीही
बोले तसे घडावे हा योग मात्र आहे
जी वाटते हवी, तू नसताच सोबतीला
भासे नको नकोशी ही दीर्घ रात्र आहे
गंभीर घेतला मी अभ्यास जीवनाचा
झालास तू गुरु मी अद्याप छात्र आहे
साध्या गुन्ह्यास माझ्या निश्चीत सूळ आहे
तू खूनही करावा जामीनपात्र आहे (स)
ऐकून तव कहाणी ''कैल्या''स वाटताहे
मी पिंकदान आहे तू फूल-पात्र आहे.
डॉ.कैलास गायकवाड
गझल:
प्रतिसाद
कैलास
रवि, 21/03/2010 - 14:39
Permalink
हे मर्द जीवना मी गाळून गात्र
हे मर्द जीवना मी गाळून गात्र आहे
देण्या लढा तुझ्याशी आता न पात्र आहे
कृपया मतला असा वाचावा.
गंगाधर मुटे
सोम, 22/03/2010 - 11:32
Permalink
ऐकून तव कहाणी ''कैल्या''स
ऐकून तव कहाणी ''कैल्या''स वाटताहे
मी पिंकदान आहे तू फूल-पात्र आहे.
लाजबाब ..!
गझल आवडली.
बेफिकीर
सोम, 22/03/2010 - 12:32
Permalink
साध्या गुन्ह्यास माझ्या
साध्या गुन्ह्यास माझ्या निश्चीत सूळ आहे
तू खूनही करावा ... जामीनपात्र आहे - व्वा!
देण्या लढा तुझ्याशी आता न पात्र आहे
या ओळी व शेर आवडले.
धन्यवाद!
अजय अनंत जोशी
सोम, 22/03/2010 - 17:12
Permalink
बोले तसे घडावे हा योग मात्र
बोले तसे घडावे हा योग मात्र आहे
भासे नको नकोशी ही दीर्घ रात्र आहे
या ओळी आणि...
गंभीर घेतला मी अभ्यास जीवनाचा
झालास तू गुरु मी अद्याप छात्र आहे
हा शेर छान आहे.
साध्या गुन्ह्यास माझ्या निश्चीत सूळ आहे
तू खूनही करावा जामीनपात्र आहे (स)
हा तर फारच छान..!
pratik bhoir
सोम, 22/03/2010 - 17:31
Permalink
लाजवाब
लाजवाब
कैलास
सोम, 22/03/2010 - 19:46
Permalink
गंगाधर मुटे,बेफिकीर,अजय अनंत
गंगाधर मुटे,बेफिकीर,अजय अनंत जोशी.....
आपणांस धन्यवाद.
डॉ.कैलास
ऋत्विक फाटक
सोम, 22/03/2010 - 20:07
Permalink
वा: वा:! ऐकतानापेक्षा वाचताना
वा: वा:!
ऐकतानापेक्षा वाचताना गझलेचा जास्त चांगला आस्वाद घेता येतो, विचार करायला वेळ मिळतो असे वाटते!
अर्थात, बसमधे ऐकतानाच गझल छान आहे हे जाणवलं होतं!
अनिल रत्नाकर
सोम, 22/03/2010 - 23:33
Permalink
अप्रतिम आहे गझल.
अप्रतिम आहे गझल.
कैलास
सोम, 22/03/2010 - 23:57
Permalink
प्रतीक,ऋत्विक फाटक व
प्रतीक,ऋत्विक फाटक व डॉ.अनिल.....आपणां सर्वांस धन्यवाद.
डॉ.कैलास