पिले खेकड्यांची
पिले खेकड्यांची, रेतीत पाडती का ठसा आपला?
पिले माणसांची, मातीत गाडती का वसा आपला?
न संपेल साठा, केंव्हाच आपल्या ह्या तलावातला
अपेक्षेत खोट्या, बेडूक फाडती का घसा आपला?
हमाली करोनी, वायाच चालला जन्म माझा असा
पिले गाढवांची, ना सोडतीच का वारसा आपला?
जसे कवडसेही, ना भेटतीच ते एकमेकां कधी
तसे आज, भावालाही न मानती फारसा आपला
धुवावेच ताटाला, स्वच्छ चेहरा तो दिसे आपला
पिले काळज्यांची, ऊगाच व्यापती आरसा आपला
...................
कसा भूत होताना वर्तमान तो ढासळे आतला
लढाया भविष्याशी देह सांडती का असा आपला?
** १) कल्पना, डॉ. बर्वे. हॅव अ नाईस डे
५) कल्पना, डॉ. पाब्रेकर.
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
शनि, 20/03/2010 - 02:09
Permalink
तुमच्या गझलांची वृत्ते फार
तुमच्या गझलांची वृत्ते फार अवघडलेली वाटतात, असतात. वाचताना, गुणगुणताना अडखळल्यासारखे होते. नेहमीच्या सहज गुणगुणण्यासारख्या, लयीत वाचता येईल अशा वृत्तांत गझल आल्यास उत्तम. शुभेच्छा. सरावाने गझलेतही नव्हे तर विचारांतही सफाई येते असा अनुभव आहे.
बेफिकीर
शनि, 20/03/2010 - 10:53
Permalink
चित्तरंजन यांच्याशी सहमत!
चित्तरंजन यांच्याशी सहमत! मलाही (ही पण) गझल वाचता आली नाही.
पण नेहमीप्रमाणे विषय, शब्दरचना, काही उल्लेख वगैरे नावीन्यपूर्ण वाटले.
माझ्याही शुभेच्छा!
धन्यवाद!
गंगाधर मुटे
शनि, 20/03/2010 - 11:54
Permalink
१ आणि ३ जास्त
१ आणि ३ जास्त आवडलेत.
माझ्याही शुभेच्छा!
धन्यवाद!
अनिल रत्नाकर
शनि, 20/03/2010 - 23:54
Permalink
चित्तरंजनजी मार्गदर्शनाबद्द्ल
चित्तरंजनजी
मार्गदर्शनाबद्द्ल आभार.
समुद्रकिनारी रेतीत खेकड्यांची चिमुकली पिल्ले रेषा ओढतात, म्हणजेच आपला ठसा उमटवुन जातात.पण माणसाला आपला ठसा उमटविण्यासाठी खुप कष्ट घ्यावे लागतात. बरेच जण प्रयत्नच सोडून देतात. दमदार पावले टाकणाराच हे करु शकतो.
अशा कल्पना सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा मोह आवरत नाही. त्यामुळे आपण म्हणता तसे गुणगुणणे शक्य होत नसेल हे मी मान्य करतो. मी अशा दृष्टीने रचना करण्याचा विचार केलेला नव्हता.
सरावाने जमेल, ह्या आपण माझ्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्द्ल आभार.
बेफिकीरजी,
धन्यवाद.
ह्यावेळी निदान तंत्रात तरी चूक करायची नाही ह्या विचारात लगावली, लय ह्याकडे दुर्लक्ष झाले. क्षमस्व.
गंगाधरजी,
अत्यंत आभारी आहे.
अजय अनंत जोशी
रवि, 21/03/2010 - 08:48
Permalink
कसा भूत होताना वर्तमान तो
कसा भूत होताना वर्तमान तो ढासळे आतला
लढाया भविष्याशी देह सांडती का असा आपला?
या ओळी आवडल्या.
अनिल रत्नाकर
रवि, 21/03/2010 - 19:58
Permalink
अजयजी, प्रोत्साहनाबद्द्ल
अजयजी,
प्रोत्साहनाबद्द्ल मनःपुर्वक धन्यवाद.
आपल्या मार्गदर्शनाबद्दल आभार.
असाच लोभ असावा.