हात माझे फुलांनी ही पोळले होते.....

हात माझे फुलांनी ही पोळले होते
पावसाचे फुवारे ही बोचले होते.....

रेशमी बंधने ही फासा परी झाली
केवड्याला भुजंगानी वेढले होते....

रोज़ मी वाट त्याची पाहू किती आता ?
मी च स्वप्ना मधे त्याला चोरले होते.....

दुखः का एवढे भारी वाटते आता ?
केशराच्या परागानी तोलले होते.....

घेत आहे मद्यपींची काळजी आता
कंठ ज्यांचे दुधाने ही पोळले होते.....

` ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे / १०-०३-२०१०.

गझल: 

प्रतिसाद

शेवटचा शेर छान.
घेत आहे मद्यपींची काळजी आता = तसं सरकारही घेतच आहे..:)
कंठ ज्यांचे दुधाने ही पोळले होते..... = तसं हल्ली सगळीकडेच भेसळ आहे म्हणा....:)
छान शेर.

वा:
परत इथे देत बसत नाही..
एवढंच सांगतो...
सगळेच शेर आवडले!

रोज़ मी वाट त्याची पाहू किती आता ?
मी च स्वप्ना मधे त्याला चोरले होते...
.

हा जास्त आवडला.

सर्वश्री अजय, ऋत्विक आणी गंगाधरजी ह्यांस,
सप्रेम नमस्कार आणी प्रोत्साहना बद्दल धन्यवाद.
लोभ असावा.
` ख़लिश ' / वि. घारपुरे. १२-०३-२०१०.

खुप छान. केवडा आवडले.