कधी र्‍हस्व माझाच मी दीर्घतो

कधी मीच शून्यात आकुंचतो
कधी र्‍हस्व माझाच मी दीर्घतो

तुला काय देऊ निवारा कुठे?
जिथे गाव माझेच मी शोधतो

लपाव्या कशाला तुझ्या भावना?
कुठे तू, कुठे मी नियम पाळतो..?

गुलाबास नसतात काटे जिथे..
सुगंधीपणाही कुठे राहतो ?

स्वतःशीच हल्ली नसे बोलणे
जगाशी बिगाशी कुठे बोलतो..

कशाला जगाचीच चर्चा हवी ?
तुला सोसले अन् तुला सोसतो

मरावे, उरावे तुझे तूच बघ
स्वतःचे तरी मी कुठे जाणतो ?

किती वाद पूर्वी ! किती भांडणे !!
अता जीव नुसताच भंडावतो...!

गझल: 

प्रतिसाद

कशाला जगाचीच चर्चा हवी ?
तुला सोसले अन् तुला सोसतो
वाव्वा!

गुलाबास नसतात काटे जिथे..
सुगंधीपणाही कुठे राहतो ?
वाव्वा!

वा, एकंदर चांगली झाली आहे गझल.

ही गझलही संपूर्ण आवडली अजयराव!

उत्तम गझल!

हरेक शेर कातिल आहे.......क्या बात है...

डॉ.कैलास

कशाला जगाचीच चर्चा हवी ?
तुला सोसले अन् तुला सोसतो

वाह ! मस्त शेर.

गुलाबास नसतात काटे जिथे..
सुगंधीपणाही कुठे राहतो ?

कशाला जगाचीच चर्चा हवी ?
तुला सोसले अन् तुला सोसतो

हे दोन शेर विशेष आवडले.

चित्तरंजन, बेफिकीर, कैलास, ज्ञानेश, चक्रपाणी धन्यवाद!

मस्त मस्त !!
तुला सोसतो.......शेर - ए - बब्बर !!

खुप आवडली. गाव, गुलाब आवडले.

स्वतःशीच हल्ली नसे बोलणे
जगाशी बिगाशी कुठे बोलतो..

अत्यंत सहज आणि सुंदर शेर झालाय!

निवारा आणि गुलाबाचे काटे हे जरासे साधे-सरळ वाटले.

छान आवडली गझल.

जयश्री, प्रताप, ऋत्विक, गंगाधर धन्यवाद!

कधी मीच शून्यात आकुंचतो
कधी र्‍हस्व माझाच मी दीर्घतो

किती वाद पूर्वी ! किती भांडणे !!
अता जीव नुसताच भंडावतो...!

सुंदर गझल !!

धन्यवाद अनंत..
तसे भेटणे राहिलेच आपले नंतर...

संपुर्ण गझलच लाजवाब.

अस्सल गालिबी शेर

अस्सल गालिबी गझल

गुलाबास नसतात काटे जिथे..
सुगंधीपणाही कुठे राहतो ?

मस्तच...

गुलाबास नसतात काटे जिथे..
सुगंधीपणाही कुठे राहतो ?

किती वाद पूर्वी ! किती भांडणे !!
अता जीव नुसताच भंडावतो...!

खूप छान गझल आहे!

स्वतःशीच हल्ली नसे बोलणे
जगाशी बिगाशी कुठे बोलतो..

कशाला जगाचीच चर्चा हवी ?
तुला सोसले अन् तुला सोसतो

>>> सुरेख... मुशायर्‍यात ऐकली होतीच..