कविता म्हणू प्रियेला..

कविता म्हणू प्रियेला..

कविता म्हणू प्रियेला की काव्यगीत मी?
साहित्यचोर टपतांना काळजीत मी

अपराध काय माझा ते तूच सांगना
लेखी तुझ्या ठरावा माझा अतीत मी

अवहेलनेस भिक्षा नाकारतो अता
जगतो असा फ़ुलावाणी टवटवीत मी

धावायचे कितीरे मी सांग जीवना
तू टाकलीस गुगली अन पायचीत मी

नाहीच अभ्रकाचे छप्पर मिळे जरी
नक्षत्र पांघरूनी या झोपडीत मी

गंगाधर मुटे

गझल: 

प्रतिसाद

धावायचे कितीरे मी सांग जीवना
तू टाकलीस गुगली अन पायचीत मी

अप्रतिम.

भन्नाट

धावायचे कितीरे मी सांग जीवना
तू टाकलीस गुगली अन पायचीत मी

अपराध काय माझा ते तूच सांगना
लेखी तुझ्या ठरावा माझा अतीत मी

वरील शेराने जर बुच्कळ्यात टाकले....
छान गझल....

डॉ.कैलास

गुगली आवडला.

प्रतिसादाबद्दल सर्वांचा आभारी आहे.

अवहेलनेस भिक्षा नाकारतो अता

धावायचे कितीरे मी सांग जीवना
तू टाकलीस गुगली अन पायचीत मी

नाहीच अभ्रकाचे छप्पर मिळे जरी
नक्षत्र पांघरूनी या झोपडीत मी

आवडलेल्या ओळी व गझलही आवडली.

गंगाधरजी,
"अतीत" काही समजला नाही, बाकी छान

"गुगली" मस्त जमली आहे :)

बेफिकिरजी,प्रसादजी प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
लेखी तुझ्या ठरावा माझा अतीत मी
"अतीत" काही समजला नाही,
वरील शेराने जर बुच्कळ्यात टाकले..

शब्द रचनेत काहीतरी गडबड असावी,शोधतोय मी.

या झोपडीत मी खुप छान आहे गझल.

भावलेला शेर :

नाहीच अभ्रकाचे छप्पर मिळे जरी
नक्षत्र पांघरूनी या झोपडीत मी

गझल छानच आहे!