भावस्थंडिल

(वृत्त - मनोरमा - गालगागा गालगागा)

पोळलेल्या काळजाला
द्या दिलासा वादळाला.

पोर छोटा पोहताना
पार गेला... हो तळाला.

ढोल वाजे भावनांचा
साथ देतो गोंधळाला.

सावजाला शोधताना
व्याधही लागे गळाला.

मानताती वीर त्याला
वेळ येता तो पळाला.

काळ येता फासताती
काजळीही काजळाला.
===========
सारंग भणगे. (२७ जानेवारी २०१०)

गझल: 

प्रतिसाद

सावजाला शोधताना
व्याधही लागे गळाला

सुंदर शेर सारंग - गझल आवडली.

सावजाला शोधताना
व्याधही लागे गळाला

वा!

सावजाला शोधताना
व्याधही लागे गळाला = सुंदर!

मानताती वीर त्याला
वेळ येता तो पळाला = तो च्या ऐवजी जो केले तर...?

धन्यवाद.

सावजाला शोधताना
व्याधही लागे गळाला
मस्त!

सावजाला शोधताना
व्याधही लागे गळाला.
ही ओळ वाचल्यावर शिकारी खुद यहाँ शिकार हो गया ही मजरूहच्या एका गीताची ओळ प्रकर्षाने आठवली.