बदल
बदल
--------------------------------------------------------------------------
आताच मी जगाला उघडून डोळे पाहीले..
आताच मी मनाला समजून थोडे पाहीले...
केव्हाच ती जरीही विसरून प्रेम गेली,
आताच मी तिलाही विसरून थोडे पाहीले...
मौनात नेमके माझ्या सारे घडून गेले,
ओठास मी कितीदा दुमडून थोडे पाहीले...
ना बांधले सुरांनी अद्याप शब्द माझे,
मी आजही सुरांना वगळून थोडे पाहीले...
मी ताटवे फुलांचे तुडवून गेलो जरीही,
कोमेजल्या कळ्यांना फुलवून थोडे पाहीले...
------------------------------------------------------नचिकेत भिंगार्डे
गझल:
प्रतिसाद
विश्वस्त
बुध, 20/01/2010 - 22:10
Permalink
तांत्रिक बाजू तपासाव्यात.
तांत्रिक बाजू तपासाव्यात.
बेफिकीर
गुरु, 21/01/2010 - 15:13
Permalink
राव अप्रतिम रचना केलीत की?
राव अप्रतिम रचना केलीत की? (अर्थात, विश्वस्तांशी सहमत आहेच) पण आपल्या रचनेत गझलियत आहे. 'झिंग आली'
अभिनंदन!