फार झाले

"आहेस माझा" म्हणाली, फार झाले!
"मा़झाच राजा" म्हणाली, फार झाले!

आलाच तो श्वास कानी गंधलेला
"आहेस ठोंब्या" म्हणाली, फार झाले!

आली मला तीच भेटाया त्वरेने
"आहेस माझा" म्हणाली, फार झाले!

हे प्रेम की वासना नाही कळाले
"वा! रे शहाणा" म्हणाली, फार झाले!

मी शेवटी तो दिला होकार माझा
"आहेस वेडा" म्हणाली, फार झाले!

ताब्यात ना हालचाली आज माझ्या
"दे हात हाता " म्हणाली, फार झाले!

गझल: 

प्रतिसाद

जमलं की!
आली मला तीच भेटाया त्वरेने
"आहेस माझा" म्हणाली, फार झाले!
हा हा हा....
"आहेस माझा" म्हणाली, फार झाले!
छान.

धन्यवाद.
At last.

आहेस ठोंब्या काय?

हे प्रेम की वासना नाही कळाले

मी शेवटी तो दिला होकार माझा

ताब्यात ना हालचाली आज माझ्या

या ओळी आवडल्या. पहिली तर फारच! मला वाटते शेर मजबूत होण्यासाठी एकदा जाणकार गझलकारांपैकी कुणाची गाठ घेऊन चर्चा करावीत. मी काही जाणकारांना भेटल्यावर निदान दृष्टीकोन तरी मिळाला मला. बाकी 'प्रतिभादेवी'च्या हाती.

शुभेच्छा!