कवडसे

फक्त येती गर्जना काळ्या ढगांतुन
थेंब पाण्याचा मिळे मग आसवांतुन!

'तोडुनी टाकीन साखळदंड सारे'..
चमकतो विश्वास त्याच्या पावलांतुन!

हेच सांगे संसदेतिल गल्बला, की..
माणसे झालीत पैदा माकडांतुन!

लंगडी असली जरी पायात एका,
गाय तर ठरते शहाणी वासरांतुन!

कोणत्या झाडाकडे मागू निवारा?
ठिबकती येथे कवडसे सावल्यांतुन!

गझल: 

प्रतिसाद

कोणत्या झाडाकडे मागू निवारा?
ठिबकती येथे कवडसे सावल्यांतुन!
छान.

कोणत्या झाडाकडे मागू निवारा?
ठिबकती येथे कवडसे सावल्यांतुन!

वा:! हा शेर खरोखरच खूप सुंदर झालाय!
'ठिबकती' या शब्दामुळे वेगळीच मजा आलीये.

बाकीचे सर्व शेर मात्र जरासे सरळसोट वाटले.

ठिबकती येथे कवडसे सावल्यांतुन!
फार मस्त!

ठिबकती येथे कवडसे सावल्यांतुन - फार सुरेख शेर मधुघट