श्वास
प्रेम व्हाले ओठ माझे चकवुनी
मोरपीशी स्पर्श झाले हरखुनी
नेत्र घेती पापणी ती कवळुनी
नर्म हाती हात गेले वितळुनी
शब्द माझे खोल गेले हरवुनी
नाव माझे ऐकु आले परतुनी
मी विसरले भान माझे हुरळुनी
चित्र त्याचे गोड गेले तरळुनी
श्वास माझे सु़ख प्याले फसवुनी
स्वप्न माझे गुप्त झाले जवळुनी
गझल:
प्रतिसाद
बेफिकीर
मंगळ, 05/01/2010 - 01:23
Permalink
नेत्र घेती पापणी ती
नेत्र घेती पापणी ती कवळुनी
नर्म हाती हात गेले वितळुनी
शब्द माझे खोल गेले हरवुनी
नाव माझे ऐकु आले परतुनी
मी विसरले भान माझे हुरळुनी
चित्र त्याचे गोड गेले तरळुनी
हे शेर छान आहेत.
शेवटच्या शेरात 'सुख' या शब्दात 'सू' दीर्घ असायला हवा बहुधा! मतला व शेवटच्या शेरांचा अर्थ माझ्या नीट लक्षात आला नाही. इतर सर्व शेरांचा फील जरूर आला व ते छानही वाटले.
धन्यवाद!
अजय अनंत जोशी
मंगळ, 05/01/2010 - 08:16
Permalink
२री आणि ३री द्विपदी
२री आणि ३री द्विपदी चांगली.
परंतु, काफियाबरोबर आणखी आशय हवा. ८ शेरांतील २रे पद जोडून ४ शेर केल्यासारखे वाटताहेत.
अर्थात, निर्णय तुमचाच.
अनिल रत्नाकर
मंगळ, 05/01/2010 - 09:27
Permalink
बेफिकीरजी, अजयजी
बेफिकीरजी,
अजयजी
सुप्रभात,
धन्यवाद
माझ्या गझलला वजन आणण्यासाठी आपले मार्गदर्शन बहुमोल आहे.
मी माझी गझल अनेकवेळा वाचतो, पण माझ्या नजरेतुन काहीतरी राह्तेच.
"सु" ची चूक ध्यानातच आली नाही.
गझलच्या तंत्रावरची आपली हुकमत सतत जाणवते.
ग्रेट.
अजयजी
आपले म्हणणे एकदम मान्य.
कौतुक आणि मार्गदर्शनानेच समोरच्याला मोठे व आपलेसे करता येते.
धन्यवाद
संदीप
मंगळ, 05/01/2010 - 22:15
Permalink
छान आहे
छान आहे
अनिल रत्नाकर
रवि, 17/01/2010 - 13:01
Permalink
धन्यवाद संदीपजी
धन्यवाद संदीपजी