स्वार्थ
वाटतो परमार्थ सध्या स्वार्थही
स्वार्थ वाटो शेवटी परमार्थही
एवढा खोटा कसा वागेल 'तो'....
ही निरर्थकता असावी सार्थही
तू निमित्ताएवढी गझलेमधे
अन निमित्ताएवढा शब्दार्थही
शिकवणीसाठी घडवले युद्ध ते
दिव्यदृष्टीच्याचसाठी पार्थही
आठ दशके स्वार्थ शिकणे चालुदे
एक घटका शिकवते नि:स्वार्थही
आपले निवृत्त झाले प्रेम पण
आठवांवर चालतो चरितार्थही
संपवावे एकदा व्यक्तीकरण
सापडावा एकदा मथितार्थही
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
रवि, 27/12/2009 - 12:52
Permalink
निमित्ताएवढी ही द्विपदी
निमित्ताएवढी ही द्विपदी आवडली. एकंदर छान.
विदेश
रवि, 27/12/2009 - 21:32
Permalink
आपले निवृत्त झाले प्रेम
आपले निवृत्त झाले प्रेम पण
आठवांवर चालतो चरितार्थही
सुरेख!
अजय अनंत जोशी
रवि, 03/01/2010 - 17:17
Permalink
निमित्ताएवढी आणि व्यक्तिकरण
निमित्ताएवढी आणि व्यक्तिकरण आवडले.
बेफिकीर
सोम, 04/01/2010 - 18:35
Permalink
चित्तरंजन व अजय, धन्यवाद!
चित्तरंजन व अजय,
धन्यवाद!
(मतल्याबाबत काही माझे समाधान झालेले नाही, 'मतला' असायला हवा म्हणून रचल्यासारल्हा मलाच वाटत आहे. दोघांच्याही प्रतिसादाने बळ आले.)
अनिल रत्नाकर
मंगळ, 05/01/2010 - 00:17
Permalink
आपले निवृत्त झाले प्रेम
आपले निवृत्त झाले प्रेम पण
आठवांवर चालतो चरितार्थही
खरे आहे.
अप्रतिम गझल.