खूप झाले, हे व्यथांना रोजचे....

खूप झाले, हे व्यथांना रोजचे समजून घेणे
थांबवा, आता तरी हे पापण्या भिजवून घेणे

हे सुखाचे चांदणे का माझिया दारात आले?
बोललो दु:खास, आता मन जरा रिझवून घेणे

सरळ वाटेवर अचानक वळण हे मार्गात आले
कठिण आहे... मी मनाची पावले बदलून घेणे

खूप काही ठरवुनी मी आखलेला मार्ग माझा
रुचत नाही मारुनी मन मी दिशा बदलून घेणे

भेट आहे प्राक्तनाची, की असावे भोग सारे
कळत नाही या मनाला, नेमके पटवून घेणे

वाचुनी पंचांग माझे, मी म्हणालो अंबराला...
ग्रहदशा तर ठीक आहे, घर जरा बदलून घेणे

उलगडत गेले मनाचे, सर्व सापेक्षी बहाणे
अर्थ भासांचे, न जमले नेमके ठरवून घेणे

मी तुझ्या या अभिनयाची कोणती लावू मिमांसा
हासुनी जमते तुला ही... वेदना कवळून घेणे

- जनार्दन केशव म्हात्रे
खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड, कळवा-ठाणे ४००६०५, भ्रमणध्वनी : ९३२३५५५६८८

गझल: 

प्रतिसाद

खूप झाले, हे व्यथांना रोजचे समजून घेणे ... हे आवडले.

सरळ वाटेवर अचानक वळण हे मार्गात आले
कठिण आहे... मी मनाची पावले बदलून घेणे
हे जरा सरळ झाले आहे. थोडा बदल सुचवतो...
कठिण आहे की मनाच्या पावलांचे मन समजणे..
सरळ वाटेवर अचानक वाट ती बदलून घेणे असे काहितरी केले तर?
मी माझ्या पद्ध्तीने सुचवले.

खूप काही ठरवुनी मी आखलेला मार्ग माझा
रुचत नाही मारुनी मन मी दिशा बदलून घेणे
अगदी खरे आहे.

मी तुझ्या या अभिनयाची कोणती लावू मिमांसा
हासुनी जमते तुला ही... वेदना कवळून घेणे
लक्षात घेण्यासारखी शब्द रचना.
पहिल्या ओळीतील 'या' या शब्दामागील अर्थ दुसर्‍या ओळीत प्रकट होतो. त्यामुळे 'या' म्हणजे कोणत्या? असा प्रश्न कोणी विचारणार नाही. अर्थात, हे माझे मत.

जना,
आवडली. पहिली,मनाची पावले,ग्रहदशा,अंतीम द्विपदी खास.
ह्या गझलेलाही तुझ्या अन्य गझलासारखी हळुवार लय आहे.

जयन्ता५२

वा वा! तिसरा, चवथा व पाचवा शेर सुंदर आहेत म्हात्रे साहेब!

खूप झाले, हे व्यथांना रोजचे समजून घेणे
थांबवा, आता तरी हे पापण्या भिजवून घेणे (मला 'थांबवू' आहे की काय असे वाटले.)

हे सुखाचे चांदणे का माझिया दारात आले?
बोलतो दु:खास आता मन जरा रिझवून घेणे (गंमत म्हणून - मध्यंतरी रणदिवेंच्या दारात सूर्य आला होता. आपल्या दारात सुखाचे चांदणे आले. छान!)

सरळ वाटेवर अचानक वळण हे मार्गात आले
कठिण आहे... मी मनाची पावले बदलून घेणे - वा वा!

खूप काही ठरवुनी मी आखलेला मार्ग माझा
रुचत नाही मारुनी मन मी दिशा बदलून घेणे - खरे आहे.

भेट आहे प्राक्तनानी, की असावे भोग सारे (प्राक्तना'ची' असे मला वाटले.)
कळत नाही या मनाला, नेमके पटवून घेणे - व्वा!

वाचुनी पंचांग माझे, मी म्हणालो अंबराला...
ग्रहदशा तर ठीक आहे, घर जरा बदलून घेणे - हा हा!

उलगडत गेले मनाचे, सर्व सापेक्षी बहाणे
अर्थ भासांचे, न जमले नेमके ठरवून घेणे - दोन्ही ओळी आवडल्या. कृपया अर्थ सांगावात अशी विनंती!

मी तुझ्या या अभिनयाची कोणती लावू मिमांसा
हासुनी जमते तुला ही... वेदना कवळून घेणे - छान!

खूप झाले, हे व्यथांना रोजचे समजून घेणे
थांबवा, आता तरी हे पापण्या भिजवून घेणे

हे सुखाचे चांदणे का माझिया दारात आले?
बोललो दु:खास, आता मन जरा रिझवून घेणे

सरळ वाटेवर अचानक वळण हे मार्गात आले
कठिण आहे... मी मनाची पावले बदलून घेणे

खूप काही ठरवुनी मी आखलेला मार्ग माझा
रुचत नाही मारुनी मन मी दिशा बदलून घेणे

भेट आहे प्राक्तनाची, की असावे भोग सारे
कळत नाही या मनाला, नेमके पटवून घेणे

वाचुनी पंचांग माझे, मी म्हणालो अंबराला...
ग्रहदशा तर ठीक आहे, घर जरा बदलून घेणे

उलगडत गेले मनाचे, सर्व सापेक्षी बहाणे
अर्थ भासांचे, न जमले नेमके ठरवून घेणे

मी तुझ्या या अभिनयाची कोणती लावू मिमांसा
हासुनी जमते तुला ही... वेदना कवळून घेणे

- जनार्दन केशव म्हात्रे
खलिफा निवास, गांधी नगर, जुना बेलापूर रोड, कळवा-ठाणे ४००६०५, भ्रमणध्वनी : ९३२३५५५६८८