गमक

कसे जगावे सुखात ह्याचे मला कळाले अता गमक
इथे तिथे शोधणे कशाला? लगेच गाठू चला नरक

खरोखरी छंदमुक्त जगणे सदैव जर का तुला हवे?
मनाबरोबर तरी अगोदर, हवेस जुळवायला यमक

लगेच खणतील कोपराने मऊ जरा लागलास तर
टिकायचे तर जमीन वरवर तरी असावी तुझी टणक

कुठेच नामोनिशाण माझे नसेल ठेवायचे तुला
हवेस सोडायलाच तू मग फितूर अश्रूंवरी उदक

पडेलही उन्मळून माझे क्षणात अस्तित्व वाळके
निदान घावामधे तुझ्या पण हवी जराशी तरी चमक

उगाच रसभंग ह्यायचा जर दिलीस उत्स्फूर्त दाद तू
इथे तुला चेहर्‍यास इस्त्री करायला पाहिजे कडक

गुलाम झालास साधनांचा... दिलीस सोडून साधना
सुचायलाही लिखाण आता पुढ्यात लागेल संगणक

गझल: 

प्रतिसाद

सुचायलाही लिखाण आता पुढ्यात लागेल संगणक
हे खरे आहे.

लगेच खणतील कोपराने मऊ जरा लागलास तर
टिकायचे तर जमीन वरवर तरी असावी तुझी टणक
हे सुद्धा खरे आहे. अर्थात, हे लिहिण्यासाठी तुम्ही निवडलेली जमीन तशी लवचिकच आहे. हा हाहा..

उगाच रसभंग ह्यायचा जर दिलीस उत्स्फूर्त दाद तू
इथे तुला चेहर्‍यास इस्त्री करायला पाहिजे कडक
मस्त!
पहिली ओळ तर फारच छान.

अजय धन्यवाद

विश्वस्त : काहीतरी घोळ झाला आहे का? मी मागे एकदा बघितले होते तेव्हा इथे नक्कीच एकापेक्षा जास्ती प्रतिसाद होते... ते त्या लोकांनी उडवले का संकेतस्थळावर काही अडचण आहे कळत नाहीये..

मुळात गझल प्रदर्शित झाल्याची तारिख नोव्हेंबर मधली दाखवतोय पण मी गझलच डिसेंबर मध्ये प्रदर्शित केली होती. बहुधा १५ डिसे. ला :(

इथल्या इतर एक-दोन गझलांविषयीही तसे झालेय असे वाटते

पुन्हा दिलेला प्रतिसाद-
सुरेख गझल, मिल्या!

लगेच खणतील कोपराने मऊ जरा लागलास तर
टिकायचे तर जमीन वरवर तरी असावी तुझी टणक

पडेलही उन्मळून माझे क्षणात अस्तित्व वाळके
निदान घावामधे तुझ्या पण हवी जराशी तरी चमक

उगाच रसभंग ह्यायचा जर दिलीस उत्स्फूर्त दाद तू
इथे तुला चेहर्‍यास इस्त्री करायला पाहिजे कडक

गुलाम झालास साधनांचा... दिलीस सोडून साधना
सुचायलाही लिखाण आता पुढ्यात लागेल संगणक

हे सर्व शेर आवडले. 'लगेच खणतील..' अगदी बेस्ट!
'नामोनिशाण' हा शब्द खटकतो जरासा.

---------------------------------------

@मिल्या- या गझलेवर ७-८ प्रतिसाद होते.
मध्यंतरी अपग्रेडेशनमधे या व इतर तत्कालीन गझलांचे प्रतिसाद गायब झालेले दिसत आहेत.

ज्ञानेश : पुन्हा प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद रे... हो विश्वस्तांनी तसे कळविले मला की काहीतरी अडचण होती.. जी आता दूर झाली आहे

कसे जगावे सुखात ह्याचे मला कळाले अता गमक
इथे तिथे शोधणे कशाला? लगेच गाठू चला नरक

वा!

लगेच खणतील कोपराने मऊ जरा लागलास तर
टिकायचे तर जमीन वरवर तरी असावी तुझी टणक

वा!

उगाच रसभंग ह्यायचा जर दिलीस उत्स्फूर्त दाद तू
इथे तुला चेहर्‍यास इस्त्री करायला पाहिजे कडक

वा!

सगळेच शेर आवडले. गझल चांगली, सफाईदार व कडक झाली आहे, मिलिंदराव. अभिनंदन!

मिलिंदराव,

आपली ही गझल आवडली. ही एक तरूण गझल आहे. खालील शेराबद्दलः

गुलाम झालास साधनांचा... दिलीस सोडून साधना
सुचायलाही लिखाण आता पुढ्यात लागेल संगणक

आपण या गझलेमधे 'यमके' सुचल्यावर शेर रचलेले नाहीत असे म्हणायचे आहे किंवा काय ते लक्षात आले नाही.

लगेच खणतील कोपराने मऊ जरा लागलास तर
टिकायचे तर जमीन वरवर तरी असावी तुझी टणक

छान!

प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद... वाहून गेले तरी वेळ काढून पुन्हा प्रतिसाद दिल्याबद्दल तर विशेष आभार...

आपण या गझलेमधे 'यमके' सुचल्यावर शेर रचलेले नाहीत असे म्हणायचे आहे किंवा काय ते लक्षात आले नाही.
>>>
भूषणराव तसे काही ... संगणकाची आपल्याला इतकी सवय झालीय की कागदावर लिहीणे सोडून दिले आहेच... एक वेळ अशी येऊ शकेल की संगणक समोर नसेल तर लिखाण सुचायचेच नाही... असा रुढार्थ...

मनाला एखाद्या गोष्टीचे व्यसन लागले किंवा एखादी विशिष्ठ मनःस्थिती असेल तरच लिहायला सुचते ... मग पुढे जाऊन असे तर होणार नाही ना की लिहिण्यासाठी प्रतिभाशक्तीचे महत्व कमी होऊन ह्या बाहेरच्या चोचल्यांचे प्रमाण वाढणार तर नाही अशी भिती व्यक्त करण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे ह्यात

गुलाम झालास साधनांचा... दिलीस सोडून साधना
सुचायलाही लिखाण आता पुढ्यात लागेल संगणक

क्या बात है....!

फुकटचा सल्ला : विश्वस्तांना विनंती की संस्थळावर फार बदल करत राहू नये. फार दिवसानंतर आलो तरी, संस्थळावर बदल चालूच असतात. हे काही पटले नाही राव..! :(

-दिलीप बिरुटे
[मराठी संकेतस्थळावरील भटका]