मीर तकी मीर ची एक गझल व त्याचे मराठी भाषांतर
मीर तकी मीर (१७२३ - १८१०) हे उर्दुचे नामवंत शायर. खुद्द मिर्झा गालिबने त्यांचा असा उल्लेख केलेला आहेः
रेखते के तुम्ही उस्ताद नही हो गालिब
कहेते हैं अगले ज़माने में कोई मीर भी था
( रेखता - उर्दु )
मीर ह्यांची एक गझल व तीचं गुजराती भाषांतर "गझलः रूप अने रंग" ह्या डॉ. रईश मनीआर ह्यांच्या पुस्तकात आहे. ती गझल, व त्यांच्या अनुमतिने त्याचे मराठी भाषांतर केले आहे.
मराठीत लीहिण्याचा सराव नसल्याने काही चुकत असेल तर कळवावे.
हस्ती अपनी हुबाब की सी है
ये नुमाइश सुराब की सी है
--> अपुले अस्तित्व एका बुडबुड्या सारखे आहे आणि हा दुनियेचा तमाशा मृगजला सारखा आहे. मृगजलात येणार्या एका बुडबुड्या सारखं जीवन आपण जगत आहोत.
नाजुकी उनके लब कि क्या कहिए?
पंखुडी इक गुलाब की सी है
-->तिच्या ओठांचा नाजुकपणा काय सांगु? जणु गुलाबाची एक पाकळीच आहे
बारबार उनके दर पे जाता हूं
हालत अब इजतराब की सी है
--> बेचैनी अशी आहे कि वारंवार तिच्या घराच्या दरवाज्या पर्यंत (फक्त दरवाज्या पर्यंत) जातो आणि परत येतो.
मीर उन नीमबाझ आंखो में
सारी मस्ती शराब की सी है
--> मीर! त्यां अर्ध्या बंद नयनांत शराबची सघळी मस्ती भरलेली आहे. अर्धे बंद डोळे सौंदर्याची नीशाणी आहे आणि नशा झाल्यावर पण डोळे अरधे बंद असतात, असा श्लेष ह्या शेरमधे वापरला आहे.
हेमंत पुणेकर
प्रतिसाद
अजय अनंत जोशी
शनि, 19/12/2009 - 08:54
Permalink
माझ्यापेक्षा प्रचंड जाणकार
माझ्यापेक्षा प्रचंड जाणकार खूप आहेत इथे.(डोळे मिचकावुन) पण छान.