रिती पोकळी

रिती पोकळी तशी दशा या आयुष्याची
उद्या वेगळी पुन्हा दिशा या आयुष्याची

इथे संपली पहाट, तेथे दुपार झाली
कुठे सांज अन कुठे निशा या आयुष्याची?

जरा लाभले म्हणे म्हणेतो दुरावलेही,
हमी द्यायची कुणी अशा या आयुष्याची?

प्रवाहातल्या दिव्यासारखे वहात जाते,
हवा नेतसे तशी दिशा या आयुष्याची

कुठे कालच्या उन्मादाचा कैफ उडाला?
कशी आज ना चढे नशा या आयुष्याची?

गझल: 

प्रतिसाद

गझल छान आहे. दुसर्‍या मिसर्‍यांमधे नेमका समारोप होत आहे की नाही यावर विचार करत होतो. मतल्यातील अलामतीतील सुट एकाच अक्षरात आणे हे एक नावीन्यच म्हणावे लागेल. वृत्त व रदीफ आवडले. अनेक ओळी आवडल्या.

धन्यवाद!

इथे संपली पहाट, तेथे दुपार झाली
कुठे सांज अन कुठे निशा या आयुष्याची?

वा.
प्रवाहातल्या दिव्यासारखे वहात जाते,
ही ओळ फार आवडली. नेहमीप्रमाणे एकंदर गझल छानच. आवडली.

रिती पोकळी तशी दशा या आयुष्याची
उद्या वेगळी पुन्हा दिशा या आयुष्याची

इथे संपली पहाट, तेथे दुपार झाली
कुठे सांज अन कुठे निशा या आयुष्याची?

सुंदर !

छान

रिती पोकळी तशी दशा या आयुष्याची
उद्या वेगळी पुन्हा दिशा या आयुष्याची

इथे संपली पहाट, तेथे दुपार झाली
कुठे सांज अन कुठे निशा या आयुष्याची?

जरा लाभले म्हणे म्हणेतो दुरावलेही,
हमी द्यायची कुणी अशा या आयुष्याची?
या ओळी आवडल्या

जरा लाभले म्हणे म्हणेतो दुरावलेही,

प्रवाहातल्या दिव्यासारखे वहात जाते,

कशी आज ना चढे नशा या आयुष्याची?
या ओळी विशेष आवडल्या.

इथे संपली पहाट, तेथे दुपार झाली
सकाळ कुठे गेली हे कळाले नाही.