पांघरूनी वेड वावरणे बरे की

पांघरूनी वेड वावरणे बरे की
भेटतो त्याला गुरू करणे बरे की

छप्परालाही अता सुचतात चेष्टा
याहुनी आकाश पांघरणे बरे की

नाटके निर्भीडतेची जीवघेणी
छान, नैसर्गीक चाचरणे बरे की!

हेच का ते प्रेम ज्याचे नाव आहे
याहुनी झटक्यामधे मरणे बरे की

पांचजन्याचा पुरे हा आव आता
आपले अस्तित्व खाकरणे बरे की

मार्ग हा नाहीतरी काट्याकुट्यांचा
फ़ाटक्या गझलेस अंथरणे बरे की

वाट आता पाहण्यापेक्षा तुझी मी
आपले आयुष्य आवरणे बरे की

पापण्यांचेही अता वय होत आहे
आसवे जाहीर पाझरणे बरे की

तू पुन्हा येशील ही भीती मनाला
याहुनी मृत्यूस घाबरणे बरे की

(सूट - पहिल्या मिसर्‍यात 'पांघरूनी' मधील 'रू' दीर्घ घेतला आहे. तो दीर्घ असतो की नाही हे नक्की माहीत नाही.)

(बेफिकिरी)

गझल: 

प्रतिसाद

वा: वा: काय सुंदर झालीये गझल!
छप्परालाही अता सुचतात चेष्टा
याहुनी आकाश पांघरणे बरे की

हेच का ते प्रेम ज्याचे नाव आहे
याहुनी झटक्यामधे मरणे बरे की

वाट आता पाहण्यापेक्षा तुझी मी
आपले आयुष्य आवरणे बरे की

खरोखरच छान झालेत हे शेर!

सुंदर गझल! मत्ला छान! वृत्त चुस्त-दुरुस्त!!! क्या बात है!!!!
हे तीन शेर खुप आवडले:

छप्परालाही अता सुचतात चेष्टा
याहुनी आकाश पांघरणे बरे की

वाट आता पाहण्यापेक्षा तुझी मी
आपले आयुष्य आवरणे बरे की

पापण्यांचेही अता वय होत आहे
आसवे जाहीर पाझरणे बरे की

(चाचरणे व खाकरणे --> अर्थ माहीत नसल्याने ते शेर कळले नाही :-( )

हेच का ते प्रेम... मधे दुसरी ओळ थोडी subtle ठेवल्यास शेर जास्त प्रभावी होउ शकतो असं मला वाटतं.
शेवटच्या शेर मधे पण भीती कुणाची हे स्पष्ट होत नाही असं वाटलं.

बाकी, ओवरऑल खुप छान! हार्दिक अभिनंदन!

सुंदर गझल! मत्ला छान! वृत्त चुस्त-दुरुस्त!!! क्या बात है!!!!
हे तीन शेर खुप आवडले:

छप्परालाही अता सुचतात चेष्टा
याहुनी आकाश पांघरणे बरे की

वाट आता पाहण्यापेक्षा तुझी मी
आपले आयुष्य आवरणे बरे की

पापण्यांचेही अता वय होत आहे
आसवे जाहीर पाझरणे बरे की

(चाचरणे व खाकरणे --> अर्थ माहीत नसल्याने ते शेर कळले नाही :-( )

हेच का ते प्रेम... मधे दुसरी ओळ थोडी subtle ठेवल्यास शेर जास्त प्रभावी होउ शकतो असं मला वाटतं.
शेवटच्या शेर मधे पण भीती कुणाची हे स्पष्ट होत नाही असं वाटलं.

बाकी, ओवरऑल खुप छान! हार्दिक अभिनंदन!

छप्परालाही अता सुचतात चेष्टा
याहुनी आकाश पांघरणे बरे की
-- भन्नाट

तू पुन्हा येशील ही भीती मनाला
याहुनी मृत्यूस घाबरणे बरे की
-- अफलातून

आयुष्य आवरणे
-- एक्सलंट

छप्पर, चाचरणे, खाकरणे, पापण्या.. हे चारही शेर आवडले.
अभिनंदन, पुलेशु.

व्वा अजून एक मस्त गझल भूषणराव
छप्परालाही अता सुचतात चेष्टा
याहुनी आकाश पांघरणे बरे की>>> मस्त पण ह्याचा पूर्ण अर्थ तुमच्याकडून ऐकायला आवडेल

हेच का ते प्रेम ज्याचे नाव आहे
याहुनी झटक्यामधे मरणे बरे की

वाट आता पाहण्यापेक्षा तुझी मी
आपले आयुष्य आवरणे बरे की

पापण्यांचेही अता वय होत आहे
आसवे जाहीर पाझरणे बरे की

तू पुन्हा येशील ही भीती मनाला
याहुनी मृत्यूस घाबरणे बरे की

>>> छान छान
वेगळी रदीफ चांगलीच निभावली आहे.
पुलेशु