गझल

..... नको रे

थुकल्याले चाटू नको रे
झुकल्याले मारू नको रे

वदल्याले खोडू नको रे
फुलल्याले तोडू नको रे

सुकल्याले वठवू नको रे
निजल्याले उठवू नको रे

फसल्याले रडवू नको रे
विझल्याले जळ्वू नको रे

पुजल्याले तोलू नको रे
नशिबाले बोलू नको रे

पळत्याले शोधू नको रे
सुटल्याले बांधू नको रे

शिकल्याले चिडवू नको रे
लिवल्याले मिटवू नको रे

गझल: 

प्रतिसाद

एक छोटासा प्रयत्न.

प्रयत्न चांगला पण ही गझल नाही

धन्यवाद फाटक्जी,
मी नीट समजू शकलो नाही.

अहो!
वाईट वाटून घेऊ नका, पण शेर म्हणावा असे एकही कडवे या कवितेत नाही.
बाराखडी वाचा म्हणजे तुमचे तुम्हालाच समजेल. (बाराखडी या वेब-साईटवरची अर्थातच.)

फाटकजी, धन्यवाद

अर्ध्या छंदातील काही गझल वाचनात आल्या होत्या. मी हा प्रयत्न प्रसिद्ध करण्याचा उद्देश हाच होता की याला गझल म्हणतात की नाही.
ऊत्तर मिळाले. आभारी आहे.