ठराव नक्की मिळेल अंतर
सुखास बोलू नका भयंकर
जमेल तैसे करा स्वयंवर
तुझ्यासवे जे सदा निघाले
करू नको या मनास बेघर
तया जनाची न ती मनाची
निलाजर्यांचा बने सिकंदर
उगाच तुमचे हिशेब झाले
कुठे तुम्ही अन कुठे कलंदर
हृदय तुझे पाहिले मघा मी
उगाच ओढू नकोस चादर
चरण कुणाचे कशा धरावे
कुणीच येथे नसे निरंतर
कुणास आत्ता कुणास नंतर
ठराव नक्की मिळेल अंतर
गझल:
प्रतिसाद
प्रसाद लिमये
शुक्र, 27/11/2009 - 19:51
Permalink
तुझ्यासवे जे सदा निघाले करू
तुझ्यासवे जे सदा निघाले
करू नको या मनास बेघर
एकदम फडाड :)
क्रान्ति
शुक्र, 27/11/2009 - 20:48
Permalink
चरण कुणाचे कशा धरावे कुणीच
चरण कुणाचे कशा धरावे
कुणीच येथे नसे निरंतर
वा! सही गझल!
बेफिकीर
शनि, 28/11/2009 - 03:10
Permalink
रात्रीचा प्रतिसाद सुखास बोलू
रात्रीचा प्रतिसाद
सुखास बोलू नका भयंकर
जमेल तैसे करा स्वयंवर - हे कळले नाही.
तुझ्यासवे जे सदा निघाले
करू नको या मनास बेघर - 'जे' चे 'ते' किंवा 'या' चे 'त्या' केले तर 'चालेल' का?
तया जनाची न ती मनाची
निलाजर्यांचा बने सिकंदर - छान! (तया = ??)
उगाच तुमचे हिशेब झाले
कुठे तुम्ही अन कुठे कलंदर - व्वा!
हृदय तुझे पाहिले मघा मी
उगाच ओढू नकोस चादर - (अभिनंदन, 'हृदय' पाहण्यासाठी)
चरण कुणाचे कशा धरावे
कुणीच येथे नसे निरंतर - खरे आहे!
कुणास आत्ता कुणास नंतर
ठराव नक्की मिळेल अंतर - हा मला सगळ्यात आवडलेला शेर!
अजय अनंत जोशी
शुक्र, 15/01/2010 - 00:00
Permalink
अरे, मी पाहिलेच नाही
अरे,
मी पाहिलेच नाही वाटते.
धन्यवाद!
सुखास बोलू नका भयंकर
जमेल तैसे करा स्वयंवर - हे कळले नाही.
स्वयंवर करणे हे भयंकर नाही.
तुझ्यासवे जे सदा निघाले
करू नको या मनास बेघर - 'जे' चे 'ते' किंवा 'या' चे 'त्या' केले तर 'चालेल' का?
'या' मध्ये थोडी जवळीक वाटते असे मला वाटले. 'त्या' मध्ये तटस्थता येईल कदाचित.
तया जनाची न ती मनाची
निलाजर्यांचा बने सिकंदर - छान! (तया = ??)
तया = त्याला
अर्चना लाळे
शुक्र, 15/01/2010 - 10:58
Permalink
स्वयंवर हा शब्द केवळ विवाह या
स्वयंवर हा शब्द केवळ विवाह या अर्थाने वापरला आहे की स्वयंवर (म्हणजे स्वतःचा वर स्वतःच ठरविणे) या अर्थाने?
शेवटच्य दोन ओळी छान्च.
अजय अनंत जोशी
शुक्र, 15/01/2010 - 22:31
Permalink
अर्चना ताई स्वयंवर हा शब्द
अर्चना ताई
स्वयंवर हा शब्द दोनही अर्थाने वापरला आहे.
शेवटच्या दोन ओळी आवडल्याबद्दल धन्य्वाद..:)
कैलास
सोम, 25/01/2010 - 21:46
Permalink
हृदय तुझे पाहिले मघा मी उगाच
हृदय तुझे पाहिले मघा मी
उगाच ओढू नकोस चादर
हृदय तुझेमी मघा पाहिले
उगाच ओढू नकोस चादर
असे केल्यास?
शेवटचे दोन शेर विशेष आवडले.
डॉ.कैलास गायकवाड
अजय अनंत जोशी
बुध, 24/02/2010 - 20:40
Permalink
कैलास, लिहिण्यास उशीर होत आहे
कैलास,
लिहिण्यास उशीर होत आहे त्याबद्दल क्षमस्व!
हृदय तुझेमी मघा पाहिले
हे तुम्ही म्हटल्याप्रमाणेच मला सुचले होते. मात्र मी नंतर बदल केला. कारण, हृदय तुझेमी मघा पाहिले असे म्हटल्यास 'मघा' म्हणजे ढगाला म्हटल्याप्रमाणेही वाटते. कारण, शब्दरचनेमुळे मी नंतर म आल्याने मघा या शब्दावर जोर पडतो आहे. माझ्या माहितीप्रमाणे 'पाहिले मघा मी' हा प्रयोग वापरात आहे. म्हणून वापरला. तुम्ही सुचविलेले चुकीचे नाही. अक्चुअली तिथे 'पाहिले मगाशी' असे चालले असते. परंतु संपादनाची सुविधा नसल्याने दुरुस्ती झाली नाही आणि माझ्याकडूनही लिहायचे राहून गेले. तुम्ही लिहिलेत हे बरे केलेत.
कैलास
बुध, 24/02/2010 - 20:44
Permalink
कारण, हृदय तुझेमी मघा पाहिले
कारण, हृदय तुझेमी मघा पाहिले असे म्हटल्यास 'मघा' म्हणजे ढगाला म्हटल्याप्रमाणेही वाटते. कारण, शब्दरचनेमुळे मी नंतर म आल्याने मघा या शब्दावर जोर पडतो आहे. माझ्या माहितीप्रमाणे 'पाहिले मघा मी' हा प्रयोग वापरात आहे. म्हणून वापरला. तुम्ही सुचविलेले चुकीचे नाही. अक्चुअली तिथे 'पाहिले मगाशी' असे चालले असते. परंतु संपादनाची सुविधा नसल्याने दुरुस्ती झाली नाही आणि माझ्याकडूनही लिहायचे राहून गेले. तुम्ही लिहिलेत
आपण म्हणता ते ठीकच आहे.
डॉ.कैलास
प्रताप
गुरु, 25/02/2010 - 16:33
Permalink
खुप छान. बेघर आवडले.
खुप छान. बेघर आवडले.
ह बा
गुरु, 27/05/2010 - 19:15
Permalink
तुझ्यासवे जे सदा निघाले करू
तुझ्यासवे जे सदा निघाले
करू नको या मनास बेघर
अप्रतिम शेर!!!