नकोसे वाटते

पौर्णिमेला चांदणे देणे नकोसे वाटते
कोकिळालाही नवे गाणे नकोसे वाटते

देत गेले दैव, मी ही घेतले जे लाभले
आज का त्या यातना घेणे नकोसे वाटते?

कैकदा दोघे म्हणालो, "रोज भेटू या इथे"
मीच येते, का तुला येणे नकोसे वाटते?

सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला,
सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!"

सांग काही तू नवे आता, पुरे गोष्टी जुन्या
त्याच कागाळ्या नि गार्‍हाणे नकोसे वाटते

झुंडिने येतात का ती टोळधाडीसारखी?
संकटांना एकटे येणे नकोसे वाटते!

गझल: 

प्रतिसाद

रचनेचा आशय छान आहे.

काफिया कोणता हे समजले नाही.

-'बेफिकीर'

सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला,
सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!"

सांग काही तू नवे आता, पुरे गोष्टी जुन्या
त्याच कागाळ्या नि गार्‍हाणे नकोसे वाटते

सुंदर!

कैकदा दोघे म्हणालो, "रोज भेटू या इथे"
मीच येते, का तुला येणे नकोसे वाटते?

सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला,
सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!"

सांग काही तू नवे आता, पुरे गोष्टी जुन्या
त्याच कागाळ्या नि गार्‍हाणे नकोसे वाटते

वरील तिन्ही शेर आवडले!

चाअन्गली गझल आहे.

देत गेले दैव, मी ही घेतले जे लाभले
आज का त्या यातना घेणे नकोसे वाटते?

कैकदा दोघे म्हणालो, "रोज भेटू या इथे"
मीच येते, का तुला येणे नकोसे वाटते?

सावली माझी म्हणे, "आराम थोडा दे मला,
सारखे मागे तुझ्या जाणे नकोसे वाटते!

सांग काही तू नवे आता, पुरे गोष्टी जुन्या
त्याच कागाळ्या नि गार्‍हाणे नकोसे वाटते

क्या बात है ! वरील सर्व शेर आवडले..!!!

-दिलीप बिरुटे