रात्र पुन्हा परीकथा रंगवेल

रात्र पुन्हा परीकथा रंगवेल
मिटणाऱ्या डोळ्यांवर पांघरेल

तीच वेळ, तीच वाट.. कालचीच
सवयीने नजर जरा घुटमळेल

नजरेचा स्पर्श जरा नजरेला
लाजाळू पापणी अता मिटेल

आसपास अता सर्व सामसूम
स्वप्नांनो अता सर्व आलबेल

भेट तशी संपली, न बोलताच
पण कळली श्वासांची घालमेल

तुटताना दूर तिथे ताराही
मनामधे काय बोलला असेल ?

गझल: 

प्रतिसाद

अफलातून! उत्कृष्ट गझल!
आसपास अता सर्व सामसूम
स्वप्नांनो अता सर्व आलबेल

भेट तशी संपली, न बोलताच
पण कळली श्वासांची घालमेल

तुटताना दूर तिथे ताराही
मनामधे काय बोलला असेल ?

लाजवाब! मीटरमुळे अजून खुलतेय गझल!

खरोखरच सुंदर गझल आहे.

अभिनंदन!

तुटताना दूर तिथे ताराही
मनामधे काय बोलला असेल ?
सुंदर विचार

भेट तशी संपली, न बोलताच
पण कळली श्वासांची घालमेल
सुंदर शेर.

बाकी तीन शेरांबाबत मात्र विचार आवश्यक.

भेट तशी संपली, न बोलताच
पण कळली श्वासांची घालमेल

सही!

तुटताना दूर तिथे ताराही
मनामधे काय बोलला असेल ?

सुरेख!
गझल आवडली.

अख्खी गझल आवडली. आलबेल, घालमेल व तारा हे विशेष आवडले

तीच वेळ, तीच वाट.. कालचीच
सवयीने नजर जरा घुटमळेल

छान.

तुटताना दूर तिथे ताराही
मनामधे काय बोलला असेल ?

वा सुरेख! तुटताना दूर तिथे ताराही फार फार सुरेख ओळ आहे.

गझल चांगली झाली आहे.

गालगागा, लगालगागा, लगागा, या नेहमीच्या वृत्तांपेक्षा हे वेगळे वाटतेय...
कृपया वृत्त सांगाल का?
शिकायचंय म्हणून विचारतोय, चिकित्सा म्हणून नव्हे...

ही गझल अक्षरगणवृत्तात नाहीये, याला एक छंद आहे.
त्यामुळे जर प्रत्येक ओळीची लघु-गुरूत फोड केली तर वेगळी येईल.

पण या गझलेचा छंद आपण लक्षात घ्यावात.

माझ्यामते ही एक अप्रतिम गझल आहे. खरीखुरी गझल! सर्व शेर गझलेचे आहेत. अत्यंत सहज शब्दरचना आहे. प्रत्येक शेराला एक भक्कम आयडेंटिटी आहे.

एक्सलंट!

-बेफिकीर!

आसपास अता सर्व सामसूम
स्वप्नांनो अता सर्व आलबेल

अक्षरशः 'फडाड' शेर आहे. अप्रतिम शेर! मान गये बॉस!

सगळ्यांचे मनापासून आभार :)

प्रसाद,
खूप आवडली गझल.

सूक्ष्म घडामोडी तरलतेने टिपल्या आहेत.