...जमेल तेंव्हा
बरा वागतो जमेल तेंव्हा
खरे बोलतो जमेल तेंव्हा
हवे सर्व ते घरात आहे
तरी चोरतो जमेल तेंव्हा
असे चूक सर्वथा तरीही
तिला भेटतो जमेल तेंव्हा
मला माळ ओढणे जमेना
फुले वाहतो जमेल तेंव्हा
कसा आज झोपडीत देवा?
'म्हणे राहतो जमेल तेंव्हा'
खुळी जिंदगी सुसाट धावे
कधी गाठतो जमेल तेंव्हा
-------------------------------------------------------
जयन्ता५२
गझल:
प्रतिसाद
ज्ञानेश.
बुध, 11/11/2009 - 11:11
Permalink
हवे सर्व ते घरात आहे तरी
हवे सर्व ते घरात आहे
तरी चोरतो जमेल तेंव्हा
असे चूक सर्वथा तरीही
तिला भेटतो जमेल तेंव्हा
हे दोन शेर आवडले.
बेफिकीर
बुध, 11/11/2009 - 12:34
Permalink
व्वा! पहिले तीनही शेर व
व्वा!
पहिले तीनही शेर व जिंदगी - फार आवडले.
छान गझल! रदीफ सुरेख आहे.
ऋत्विक फाटक
गुरु, 12/11/2009 - 15:41
Permalink
मला माळ ओढणे जमेना फुले वाहतो
मला माळ ओढणे जमेना
फुले वाहतो जमेल तेंव्हा
मस्तच!
खुळी जिंदगी सुसाट धावे
कधी गाठतो जमेल तेंव्हा
हाही सुंदर!!
चित्तरंजन भट
शुक्र, 13/11/2009 - 11:12
Permalink
वा गझल चांगली झाली आहे. मथळा,
वा गझल चांगली झाली आहे. मथळा, मक्ता व दुसरा शेर विशेष आहेत.
बेफिकीर
शुक्र, 13/11/2009 - 14:27
Permalink
खुळी जिंदगी सुसाट धावे कधी
खुळी जिंदगी सुसाट धावे
कधी गाठतो जमेल तेंव्हा
व्वा!
यात 'खुळी' हा शब्द का आहे ते लक्षात आले नाही. तसेच, 'कधी' ऐवजी 'तिला' असेही चालेल काय?
अर्थात, शेर मुळातच सुसाट असून त्यात असल्या गोष्टींची चर्चा अनावश्यक आहे याची नम्र जाणीव आहे.
अजय अनंत जोशी
शुक्र, 13/11/2009 - 17:00
Permalink
खुळी जिंदगी... व्वा! मस्त
खुळी जिंदगी...
व्वा!
मस्त शेर.
क्रान्ति
शुक्र, 13/11/2009 - 23:05
Permalink
गझल आवडली. मला माळ ओढणे
गझल आवडली.
मला माळ ओढणे जमेना
फुले वाहतो जमेल तेंव्हा
सही!