अलिप्तता
मनामनामधे दडून राहिली अलिप्तता
मिठीत देह गोठले तरी उरी अलिप्तता!
मिठासदार चार अक्षरे वदून, अंतरी
कशी अभिन्न भावशून्य राहिली अलिप्तता?
धुमार पावसातही भिजून अंग कोरडे
अशी जडून कातडीस राहिली अलिप्तता!
अफाट ज्ञान सागरासमान लोटले तरी
इथे दडून शिंपल्यात राहिली अलिप्तता!
कुणी जगा सुखाविण्या अरण्यवास भोगतो
अशी कुठेतरी दिसून ये खरी अलिप्तता!
गझल:
प्रतिसाद
बेफिकीर
गुरु, 29/10/2009 - 07:04
Permalink
वा वा! धुमार पावसातही भिजून
वा वा! धुमार पावसातही भिजून अंग कोरडे - छानच
इथे दडून शिंपल्यात राहिली अलिप्तता - सुरेख ओळ व द्विपदी!
रदीफ नावीन्यपूर्ण व बहुतांशी सुंदर निभावलेली वाटली.
अभिनंदन! गझल आवडली.
क्रान्ति
गुरु, 29/10/2009 - 22:17
Permalink
अफाट ज्ञान सागरासमान लोटले
अफाट ज्ञान सागरासमान लोटले तरी
इथे दडून शिंपल्यात राहिली अलिप्तता!
कुणी जगा सुखाविण्या अरण्यवास भोगतो
अशी कुठेतरी दिसून ये खरी अलिप्तता!
वा! आवडली गझल. सगळ्याच द्विपदी उत्तम!