नको फिरून बोलणे नकोच आज भेटणे
नको फिरून बोलणे नकोच आज भेटणे
नको फिरून बोलणे नकोच आज भेटणे
नकोच तेच लाजणे नकोच दूर सारणे
इथे तुझ्याविना झुरून गप्प राहती फुले
लुटून गंध ने जरा.... हवे तुझे दुखावणे
तनामनात आजही तुझाच श्वास राहतो
फिरून आठवे मला तुझेच छेड काढणे
जशा सरी अधीरती बघून उष्ण ही धरा
तुला कधी जमेल का नभासमान भेटणे
किती बघायची तुझी इथे खुलून वाट मी?
वरून आठवायचे तुझे मधाळ बोलणे
निघू म्हणून अंगणात थांबतोस तू जरा
सुरूच राहते युगात त्या क्षणास गुंफणे
जवान युद्धभूवरी सुसज्ज राहती जसे
तयार राहती तशी तुझी सदैव कारणे
जरी न दाखवी हवे तसेच रूप देखणे
सुटे न आरशा तुझ्यात चेहर्यास पाहणे
-सोनाली जोशी
गझल:
प्रतिसाद
आनंदयात्री
शनि, 24/10/2009 - 23:21
Permalink
इथे तुझ्याविना झुरून गप्प
इथे तुझ्याविना झुरून गप्प राहती फुले
लुटून गंध ने जरा.... हवे तुझे दुखावणे
वा......
किती बघायची तुझी इथे खुलून वाट मी?
वरून आठवायचे तुझे मधाळ बोलणे
हा ही आवडला..
बेफिकीर
रवि, 25/10/2009 - 01:17
Permalink
एक 'उथळ' आशयाची
एक 'उथळ' आशयाची गझल!
-बेफिकीर!
क्रान्ति
रवि, 25/10/2009 - 09:08
Permalink
जशा सरी अधीरती बघून उष्ण ही
जशा सरी अधीरती बघून उष्ण ही धरा
तुला कधी जमेल का नभासमान भेटणे
वा!
निघू म्हणून अंगणात थांबतोस तू जरा
सुरूच राहते युगात त्या क्षणास गुंफणे
अतिशय तरल अनुभूति!
गझल आवडली सोनाली.
जयन्ता५२
रवि, 25/10/2009 - 22:31
Permalink
सोनाली, गझल
सोनाली,
गझल आवडली.छेड,मधाळ,क्षण्,आरसा हे शेर छान जमून आलेत.
फक्त जवानाचा शेर नाही पटला.जवान युध्दभूमीवर ज्या उदात्त कारणासाठी सज्ज असतात त्या भावनेशी त्याच्या खोटया (हाच अर्थ अभिप्रेत असावा) कारणांच्या सज्जतेशी तुलना विसंगत (इनअॅप्रोप्रिएट्)वाटते.इथे दुसरी एखादी उपमा नक्कीच शोधता येईल!
जयन्ता५२
पुलस्ति
सोम, 26/10/2009 - 19:22
Permalink
आरसा आणि अंगण हे शेर आवडले!
आरसा आणि अंगण हे शेर आवडले!
श्याम जाधव
गुरु, 29/10/2009 - 17:29
Permalink
इथे तुझ्याविना झुरून गप्प
इथे तुझ्याविना झुरून गप्प राहती फुले
लुटून गंध ने जरा.... हवे तुझे दुखावणे
जशा सरी अधीरती बघून उष्ण ही धरा
तुला कधी जमेल का नभासमान भेटणे
निघू म्हणून अंगणात थांबतोस तू जरा
सुरूच राहते युगात त्या क्षणास गुंफणे
जवान युद्धभूवरी सुसज्ज राहती जसे
तयार राहती तशी तुझी सदैव कारणे
जरी न दाखवी हवे तसेच रूप देखणे
सुटे न आरशा तुझ्यात चेहर्यास पाहणे
छान...!
नादमय गझल!