काय सुनसान पोकळी आहे
काय सुनसान पोकळी आहे
की मनालाच काजळी आहे?
कालची भांडणे बरी होती
शांतता आज वादळी आहे
वादळे मीच आणतो आहे
त्यात माझीच पाकळी आहे
'जिंकणे, हारल्याविना काही'
कल्पना खूप आगळी आहे
भूतकाळात जायला आता
आठवण फक्त मोकळी आहे
'जे न क्षणभर विसावती'... जीवन
त्या क्षणांचीच साखळी आहे
तू कळवलेस ते बरे झाले
'आपल्याहीमधे फळी आहे'
मी तुझ्यासारखा कसा होऊ?
भूमिका वेगवेगळी आहे
लोकही काय भेटले येथे!
दोन कानांमधे नळी आहे
फार पाहू नको तिला आता
'बेफिकिर' जखम आंधळी आहे
गझल:
प्रतिसाद
बेफिकीर
शुक्र, 16/10/2009 - 11:58
Permalink
मक्ता - 'फार पाहू नको तिला
मक्ता - 'फार पाहू नको तिला आता
बेफिकिर जखम आंधळी आहे'
'पाहून' मधील 'न' चुकून लिहिला गेला.
-बेफिकीर!
अजय अनंत जोशी
शनि, 17/10/2009 - 09:55
Permalink
शांतता आज वादळी आहे -
शांतता आज वादळी आहे - छान.
'जिंकणे, हारल्याविना काही'
कल्पना खूप आगळी आहे
यावरून माझ्या "शब्द सारे भेटले"मधील 'गंध धुंद पाकळ्यांनो' या कवितेतील ओळी आठवल्या...
खेळ काही जिंकताना हारण्याची रीत घ्या...||
फार पाहू नको तिला आता
'बेफिकिर' जखम आंधळी आहे
हे ही छान.
ऋत्विक फाटक
शनि, 17/10/2009 - 22:33
Permalink
मी तुझ्यासारखा कसा
मी तुझ्यासारखा कसा होऊ?
भूमिका वेगवेगळी आहे
छान!
लोकही काय भेटले येथे!
दोन कानांमधे नळी आहे
चांगला आहे, तो 'नळी' शब्द मात्र टोचतोय.
फार पाहू नको तिला आता
'बेफिकिर' जखम आंधळी आहे
पुन्हा एकदा मक्ता छान जमलाय!
कीप इट अप!
ज्ञानेश.
रवि, 18/10/2009 - 10:14
Permalink
भांडणे आणि शेवटचा शेर आवडला.
भांडणे आणि शेवटचा शेर आवडला.
बेफिकीर
सोम, 19/10/2009 - 18:19
Permalink
फाटकसाहेब, आपल्या 'कीप इट
फाटकसाहेब,
आपल्या 'कीप इट अप'चे मनापासून आभार!
इतरांचेही मनापासून आभार
-बेफिकीर!