शेवटी झोपायचे आहे सदासाठी तुला
जीवनाच्यासारखा तूही लळा लावू नको
जीवनी येऊ नको, आलीस तर जाऊ नको
देव ज्याचे नाव तो देवत्व कोठे पाळतो?
माणसा माणूसकीची बंधने पाळू नको
जन्म घेताना प्रवेशाच्या अटी ऐकून घे
आसवे जोपास बाळा, आसवे त्यागू नको
शेवटी झोपायचे आहे सदासाठी तुला
झोपही येणार नाही एवढा जागू नको
एकनाथाने समाधी माउलीची शोधली
संत येथे गाडले, तू चांगला वागू नको
आपल्या कादंबरीचे पान किंवा धूळ हो
वर्गणी भरल्याप्रमाणे तू मला चाळू नको
आजही नाराज का होतोस दैवा एवढा?
जन्म आला वेगळा हा, मागचे काढू नको
एवढे सांभाळ नाते की बनो इतिहास तो
मोडण्या आलेच तर मग हाकही मारू नको
वाग तू साधेपणाने अन्यथा हो 'बेफिकिर'
मार्ग तू स्वीकार कुठलाही, इथे राहू नको
गझल:
प्रतिसाद
ऋत्विक फाटक
मंगळ, 06/10/2009 - 20:18
Permalink
छान! रोज एकाहून एक सवाई गझल
छान!
रोज एकाहून एक सवाई गझल लिहिताय!
ही चांगलीच प्रवाही आणि अर्थवाही झालीये!
देव ज्याचे नाव तो देवत्व कोठे पाळतो?
माणसा माणूसकीची बंधने पाळू नको
जन्म घेताना प्रवेशाच्या अटी ऐकून घे
आसवे जोपास बाळा, आसवे त्यागू नको
आणि अभंगांप्रमाणे शेवटी 'बेफिकीर' हे बिरूदही गझलेत चांगलं एस्टॅब्लिश करताय!
स्वदेश
बुध, 07/10/2009 - 19:25
Permalink
एवढा जागू नको हे आवडले. बाकी
एवढा जागू नको हे आवडले. बाकी फारसे नाही. बेफिकीर हे आपले नाव आपण चान्गल्या पद्धतीने वापरले आहेत. अभंगात अमका म्हणे असे असते. गजलेत तसे नसते.
-स्वदेश कानिटकर
विदेश
शुक्र, 09/10/2009 - 20:18
Permalink
देव ज्याचे नाव तो देवत्व कोठे
देव ज्याचे नाव तो देवत्व कोठे पाळतो?
माणसा माणूसकीची बंधने पाळू नको
झकास !