गझल-" म्हणून जगणे आले"-

"म्हणून जगणे आले"-

जन्माला जगती आलो, म्हणून जगणे आले
मरणे ना अपुल्या हाती, म्हणून जगणे आले!

फुलले गुलाब भवती - काटेच टोचती मजला
वेदना खोलवर तरिही, जगण्याला जपणे आले!

घायाळ पहाण्या मजला - हे सगेसोयरे टपले
जखमी ना दिसण्यासाठी - मुखवटयात हसणे आले!

ठेवण्या सुखात तयाना मी वाल्या कोळी झालो,
ते वाटेकरी सुखाचे - प्रारब्ध भोगणे आले!

मम जीवन दुस-यासाठी, की स्वतःस जगण्यासाठी?
मजला ना सुटले कोडे - म्हणून जगणे आले !!

गझल: 

प्रतिसाद

श्री. विदेश,

आशय चांगला आहे. तंत्र बाराखडीत दिले आहेच. मला त्याचा खूप लाभ झाला.

-सविनय
बेफिकीर!

प्रतिसादामुळे हुरूप येतो. कल्पना मनात रेंगाळत असतातच. प्रोत्साहनाबद्दल खूप आभार.

धन्यवाद.आपल्या मार्गदर्शनानुसार मीहि बाराखडीच्या तंत्राचा लाभ घेण्याचा प्रयत्न करतो.