सये...

सये, तुझ्या रूपाने, चांदव्याला झिजवावे,
धुंद पावसाला तुझ्या, पापण्यांत भिजवावे |

सये, तुझ्या केसांत, मोगर्‍याला गुंतवावे,
तुझ्या सुवासात त्याने, सारे गंध विसरावे |

सये, तुझ्या डोळ्यांत, सागराला साठवावे,
त्याच्या किनार्‍याला तुझे, पैलतीर शोधवावे |

सये, तुझ्या ओठांनी, गुलाबाला चुंबवावे,
त्या साखरगोडीने त्याला, दिनरात झिंगवावे |

सये, तुझ्या गालांवर, दवबिंदू ओघळावे,
ते अमृत पिऊन मी, आयुष्य भागवावे |

गझल: 

प्रतिसाद

ही रचना गझल नाही. तंत्रशुद्ध रचना कालांतराने अप्रकाशित/विचाराधीन करण्यात येतात, ह्याची नोंद घ्यावी.

सये, तुझ्या गालांवर, दवबिंदू ओघळावे,
ते अमृत पिऊन मी, आयुष्य भागवावे |
चांगला विचार आहे. पण...
रचनेत तंत्राचा अभ्यास दिसला नाही. सुरुवातीला होत काही काही. तरी प्रयत्न करा.