साडेसाती

देईल का मज कुणी दिलासा
साडेसातीत हवाहवासा

म्हणती साडेसातीमध्ये
फिरते घर अन् फिरतो वासा

नुसती तडफड साडेसाती
जळावाचूनी जैसा मासा

सहजासहजी होते गोची
उच्छ्‌वासांचा होई उसासा

साडेसातीनंतर तरी का
मनासारखा पडेल फासा?

-अविनाश ओगले

गझल: 

प्रतिसाद

ही गझलेपेक्षा साडीसातीवरील थोडी गमतीदार कविताच वाटते आहे.

साडेसातीनंतर तरी का
मनासारखा पडेल फासा?
हे छान!
तरी मात्रा मोजून पहा.....
ही कवितेसारखी वाटते हेही खरे!
(....आणि माझे हे मत सर्वांसाठी असते बरं का! )
चुभुद्याघ्या.