----सोडू नकोस ----

कोवळी कळि मी अजुन मला असे तोडू नकोस
रात्र ही काळोखि आहे ,मला असे सोडू नकोस

भेटतील अजुन तुला ब~याच अश्या कळ्या
स्वाद त्यांचा घे ज़रा पण असे मोडू नकोस

शांत तेच्या चाहुलित हो खबरदार तू
टाळ एने समीप ,पण असे भोडू नकोस

सांग सांग तुला आता काय ते नको हवे
पुरे झाले खेळ तुझे ,पण ( नाते )असे जोडू नकोस

मी असेन कविता तुझी दाखवेन आरसा तुला
ह्रदय तुझे स्वच्छ कर ,पण (मला ) असे खोडू नकोस

दुख माझे तुला कळेल ,आज नाही उद्या तरी
ये पुन्हा जीवनात .,पण वा~यावर सोडू नकोस

नेहा परी ........

गझल: 

प्रतिसाद

नेहा परी....

सदस्यत्वाचे नाव आवडण्यासारखेच आहे.

'भोडू' म्हणजे काय? 'द्विपदींचा' आशय सुरेख आहे.

तंत्र नक्की तुला जमेल... आज नाही.. उद्या तरी
शुभेच्छा सगळ्यांच्या आहेतच..तंत्रामध्ये रोडू नकोस!

-सविनय
बेफिकीर!

मी असेन कविता तुझी दाखवेन आरसा तुला
ह्रदय तुझे स्वच्छ कर ,पण (मला ) असे खोडू नकोस
ह्रदय तुझे स्वच्छ कर-- चांगली कल्पना.
..... लिहिण्याचे सोडू नकोस. आम्ही नक्की वाचू.

नेहा,
शेर आवडले

मी असेन कविता तुझी दाखवेन आरसा तुला
ह्रदय तुझे स्वच्छ कर ,पण (मला ) असे खोडू नकोस

दुख माझे तुला कळेल ,आज नाही उद्या तरी
ये पुन्हा जीवनात .,पण वा~यावर सोडू नकोस

नेहा,
खुपच सुंदर....
इथे शिकण्यासारख खुप आहे...
तु फक्त लिहित रहा.............