मंजूर नाही

नको बंधने, जाच मंजूर नाही
नदीला किनाराच मंजूर नाही !

कशी साथ द्यावी तुझ्या कीर्तनाला?
मृदंगास ठेकाच मंजूर नाही !

तुला शिंपडावे सुखाच्या सरींनी,
तुझ्या श्रावणालाच मंजूर नाही

हसू तेच ओठी, खळी तीच गाली,
कशी आज ही लाच मंजूर नाही ?

तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे?
वसंता, तुझा जाच मंजूर नाही !

मिळेना तुझ्या साक्षिने न्याय येथे,
दिलेला पुरावाच मंजूर नाही

लपेटून घ्यावे तुला मी, मला तू,
दुरावा कुणालाच मंजूर नाही !

अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा,
'तुझी भेट आताच मंजूर नाही '

गझल: 

प्रतिसाद

वाहवा! अनेक शेर आवडले. चांगल्या शेरांची टक्केवारी हा मला स्वतःला एक फार भेडसावणारा प्रश्न आहे. आपण तो सहज सोडवता असे दिसते.

नको बंधने, जाच मंजूर नाही
नदीला किनाराच मंजूर नाही ! छानच!

कशी साथ द्यावी तुझ्या कीर्तनाला?
मृदंगास ठेकाच मंजूर नाही ! - छान!

तुला शिंपडावे सुखाच्या सरींनी,
तुझ्या श्रावणालाच मंजूर नाही - वा वा!

हसू तेच ओठी, खळी तीच गाली,
कशी आज ही लाच मंजूर नाही ? - उत्तम! फार सुरेख शेर!

तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे? - हा मिसरा खूप आवडला.
वसंता, तुझा जाच मंजूर नाही !

मिळेना तुझ्या साक्षिने न्याय येथे,
दिलेला पुरावाच मंजूर नाही

लपेटून घ्यावे तुला मी, मला तू,
दुरावा कुणालाच मंजूर नाही !

अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा,
'तुझी भेट आताच मंजूर नाही '

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------

तिन्ही शेर अंती तसे 'ठीक' मधले
तुला 'फक्त का पाच' मंजूर नाही?

-सविनय
बेफिकीर!

छान गझल!
वसंत, ठेका आणि लाच विशेष आवडले!

भन्नाट्च

कशी साथ द्यावी तुझ्या कीर्तनाला?
मृदंगास ठेकाच मंजूर नाही !

तुला शिंपडावे सुखाच्या सरींनी,
तुझ्या श्रावणालाच मंजूर नाही

हसू तेच ओठी, खळी तीच गाली,
कशी आज ही लाच मंजूर नाही ?

तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे?
वसंता, तुझा जाच मंजूर नाही !

नको बंधने, जाच मंजूर नाही
नदीला किनाराच मंजूर नाही !

नदीला किनाराच मंजूर नाही ही ओळ फार चांगली आहे. जाच थोडा खटकला पहिल्या ओळीतला. नदीशी सुसंगत असा शब्द हवा होता असे वाटून गेले.

हसू तेच ओठी, खळी तीच गाली,
कशी आज ही लाच मंजूर नाही ?

ही द्विपदीही विशेष आवडली आणि त्यानंतरचा जाचही. एकंदर तुमच्या गझला चांगल्या असतात. त्यामुळे नावडण्याच्या प्रश्नच नाही.

फर्मास!

एकदम आवडली गझल.

नको बंधने, जाच मंजूर नाही
नदीला किनाराच मंजूर नाही !

तुला शिंपडावे सुखाच्या सरींनी,
तुझ्या श्रावणालाच मंजूर नाही

हसू तेच ओठी, खळी तीच गाली,
कशी आज ही लाच मंजूर नाही ?

लपेटून घ्यावे तुला मी, मला तू,
दुरावा कुणालाच मंजूर नाही !

एकदम दर्जेदार! मानलं बुवा.

हसू तेच ओठी, खळी तीच गाली,
कशी आज ही लाच मंजूर नाही ?
क्या बात है! हा शेर अतिशय आवडला.

आहा...... फार फार आवडली गं !! मस्तच !!

हसू तेच ओठी, खळी तीच गाली,
कशी आज ही लाच मंजूर नाही ?

तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे?
वसंता, तुझा जाच मंजूर नाही !

लपेटून घ्यावे तुला मी, मला तू,
दुरावा कुणालाच मंजूर नाही !

अरे, त्या 'उद्या'ला कुणी आज सांगा,
'तुझी भेट आताच मंजूर नाही '

------------- झकास!
जयन्ता५२

क्रान्ती,

'तुझ्या सांगण्यानेच मी का फुलावे'?

हा जो मिसरा आहे, तो अप्रतिम आहे.

या मिसर्‍याला बेफिकीरचा पुन्हा 'सलाम' !

आपला हा शेर मोमीनच्या शायरीसारखा वाटला.

वा: वा:!
अफलातून रचना आहे!
उत्तमोत्तम गझलांचा हंगाम सुरू झालाय म्हणायचा!

मतला, वसंताचा शेर व शेवटचे दोन शेर...झक्कास.