दवबिंदू
तू जीवनात नाही आता कळून गेले.
वरदान आसवांचे मजला मिळून गेले.
दिसती नभात काही घन कृष्ण पावसाचे,
हे नेत्र वर्षले अन् ते घन निघून गेले!
शोधीत तेच धागे फिरतो अजून मीही...
ते बंध रेशमांचे सारे तुटून गेले.
आता किती मी आणि उजळू तुझ्या स्मृतींना...
साठ्यांत शून्य आता आठव उरून गेले.
बाहेर काढल्या मी त्या तुझ्या भेटवस्तू,
जे हरविले ह्रदय माझे, सापडून गेले!
झोप अशी आली त्या शीत उष:काली,
नयनांतिल दवबिंदू ओसरून गेले!
बाकी पुढ्यात आता अज्ञात पायवाटा
ते विश्व तुझे-माझे मागे सरून गेले.
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
बुध, 02/09/2009 - 21:33
Permalink
शोधीत तेच धागे फिरतो अजून
शोधीत तेच धागे फिरतो अजून मीही...
ते बंध रेशमांचे सारे तुटून गेले.
व्वा! सुंदर शेर!
आपल्याला गझल दुरुस्त करणे ( सुधारणे ) 'थोडेसे' जरुरीचे (आवश्यक) आहे असे वाटले.
पुर्वी असाच होतो, आता सुधारलो मी
ते व्हायचेच होते, हे व्हायचेच होते
अजय अनंत जोशी
शुक्र, 04/09/2009 - 09:39
Permalink
मी असे केले.... तू जीवनात
मी असे केले....
तू जीवनात नाही आता कळून गेले
वरदान आसवांचे मजला भरून गेले
मजला म्हणजे माळा असा अर्थ मी लावला आहे.
बाकी तांत्रिक बाबी पहालच.