फुलांना दंश काट्यांचे हवे होते.....

फुलांना दंश काट्यांचे हवे होते
गुलाबी भावनांना हे हवे होते.....१.

जराशी पालवी फुटली असावी तो
कुणाला रोपटे सारे हवे होते !.....२.

कधी बुलबुल रडावी, नी कधी माळी !
फुलानां काय हे सारे नवे होते ?.....३.

जराशी आग दोघांच्या मनीं झाली
जगाला हेच तर सारे हवे होते.....४.

फुलांचा जीव जातो ह्या सुगंधाने !
जगाला अत्तराचे का नवे होते ? .....५.

नका जाऊ ` ख़लिश ' त्यांच्या असे दारी
अरे हे नेमके त्यानां हवे होते !.....६.

` ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे/२८-०८-२००९

गझल: 

प्रतिसाद

गझल एकंदर छान आहे. आवडली. तुमच्या रचना दिवसेंदिवस अधिकाधिक सफाईदार होत आहेत. तेवढा तो बुलबुल (आणि त्याची उर्दू भावंडे) टाळता आल्यास उत्तम!

मा. चित्तरंजनजी, नमस्कार आणी प्रोत्साहना बद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

उर्दू शब्द किंवा तत्सम पर्याय कमी करण्याचा माझा ही प्रयत्न आणी आग्रह आहे. आशा आहे सफळता मिळेल.

` फ़िराक़ ' गोरखपुरी ह्यांचा एक शेर प्रस्तुत करतो.

" मैं होश्-ए-अनादिल हूं , मुश्किल है बदल जाना
अय वादि-ए-सबा, मेरी करवट तो बदल जाना..."

* आपल्या सारख्या काव्य गुलझारांच्या झुळुकेने ते ही हळु हळु सहज शक्य होईल.
` ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे / २९-०८-२००९.

श्री. खलिश,

आशय आवडला.

मात्र, प्रथम आपल्याला गझल दुरुस्त करणे आवश्यक आहे.

तिसर्‍या व पाचव्या शेरांत रदीफच बदलली आहे. मक्त्यात काफिया आलेला नाही.

कृपया दुरुस्त करावेत म्हणजे आस्वाद घेताना सहजपणे घेता येतो.

रचना तंत्रशुद्ध नाही. अन्त्ययमक अखेरपर्यंत बदलायला नको. शेवटच्या द्विपदीत यमक हवे. कृपया हे दोष दूर करावे. धन्यवाद.

माननीय, भूषणजी आणी विश्वस्त, सप्रेम नमस्कार.
ह्या कृती मधे मी " होते " हा रदीफ़ आणी अनुक्रमे : ` हवे ', ` नवे ' ह्यानां काफ़िया धरले आहेत. असो. लोभ असावा ही विनंती.
- ` ख़लिश '- वि. घारपुरे / २९-०८-२००९.

अच्छा अच्छा!

मग मतला रचायचा राहिला असावा बहुधा!

हरकत नाही. मला अनेक शेरांचा आशय आवडला.