चुंबने घेउनी जे तुला बोचले....
चुंबने घेउनी जे तुला बोचले
कोवळे तेच काटे मला बोचले.....
शोधतो रोज वाटा नव्या आज ही
ते पुराणेच काटे मला बोचले.....
जे कधी ना वनीं , डोंगरी बोचले
आंगणाचेच काटे मला बोचले !.....
आसवांची कमी ना कधी भासली
चावरे तेच वारे मला बोचले.....
मैफिली त्या जुन्या कोरड्या सोडल्या
तेच साकी व प्याले मला बोचले.....
मी तुझा तोच आहे पुराणा ` ख़लिश '
ते पुराणे निसासे मला बोचले.....
` ख़लिश '- विठ्ठल घारपुरे / १३-०८-२००९.
गझल:
प्रतिसाद
भूषण कटककर
शुक्र, 14/08/2009 - 00:42
Permalink
"मी तुझा तोच आहे पुराणा
"मी तुझा तोच आहे पुराणा खलिश"
वा! आपले खयाल चांगले वाटले. मतल्यात 'तुला - मला' करून नंतर सर्वत्र 'मला' हा काफिया घेणे जरी नियमावलीत मान्य असले तरी वैविध्यपूर्ण वाटत नाही असे तांत्रिकदृष्ट्या म्हणावेसे वाटते.
परत - निसासे म्हणजे काय?
चुंबने घेउनी जे तुला बोचले
कोवळे तेच काटे मला बोचले..... - 'तेच' चे प्रयोजन काय?
शोधतो रोज वाटा नव्या आज ही
ते पुराणेच काटे मला बोचले..... - व्वा! शेर आवडला.
जे कधी ना वनीं , डोंगरी बोचले
आंगणाचेच काटे मला बोचले !..... - 'जे' चे प्रयोजन काय?
आसवांची कमी ना कधी भासली - 'कमी' इज नॉट मराठी श्टायल!
चावरे तेच वारे मला बोचले..... - छान मिसरा!
मैफिली त्या जुन्या कोरड्या सोडल्या - कोरड्या सोडल्या हे फार आवडले. ( मीही सध्या तशाच सोडतोय)
तेच साकी व प्याले मला बोचले..... ( साकी ही संकल्पना मराठीत नसावी.)
मी तुझा तोच आहे पुराणा ` ख़लिश ' - छानच!
ते पुराणे निसासे मला बोचले..... - निसासे?
जाहीर प्रतिसाद असा दिल्याबद्दल माफ करावेत, पण,
मी हा असाच आहे, माझे असेच आहे
स्वीकार जे हवे ते, जेव्हा रुचेल तेव्हा
धन्यवाद!
खलिश
शुक्र, 14/08/2009 - 12:25
Permalink
भूषणजी, आपल्या प्रतिसादा
भूषणजी,
आपल्या प्रतिसादा बद्द्ल धन्यवाद.आपल्या सूचना योग्यच असतात, आणी आपली पारदर्शकता परखड पण औचित्यपूर्णच असते, त्या मुळे राग येण्याचा प्रश्नच नाही.
आपल्या शंकाचे निराकरण असे :
१.
निसासे=उसासे. ( हा आमच्या गुजराती-मराठी मधे सर्रास वापरला जाणारा शब्द असल्या मुळे सवयीने ओघाने वापरला गेला...क्षमस्व.)
* ( जरी विश्वस्तांचा प्रतिसाद किंवा सूचना आली नसली तरी इथे उसासे असे वाचावे आणी हा बदल करावा ही विनंती )
२.
`तेच' चे प्रयोजनः
इथे `तेच' म्हणजे फक्त ते च काटे मला बोचले....जे कधी काळी तुला बोचले होते असे आहे.इथे माझा भार फक्त त्याच काट्यां वर आहे...( फार वर्षां पूर्वी श्री आचार्य अत्रे ह्यांनी `च' चे महत्व काय असे विचारल्या वर एका मान्यवर राजकारण्या च्या प्रश्ना वर कोटी केली होती, ती मी टाळतो ....)
३.
`कमी' जरी मराठीत रुढ नसला तरी कलोकियली वापरला जातो, म्हणून घेतला आहे. तसेच साक़ीचे ही आहे.
४.
मतल्यात 'तुला - मला' करून नंतर सर्वत्र 'मला' हा काफिया घेणे :
हज़रत,
एक शेर आठवतो आहे, तो असा :
" दे फडक ने की इजाज़त सैयाद
शब्-ए-अव्वल है गिरफ़तारी की "
- उमराव जान ` अदा' /( मिर्झा महोम्मद हादी `रुस्वा' )
* हुज़ूर, अताश्या कुठे मी फडफडायला सुरुवात केली आहे....मला जसे जमेल
तसा फडफडतो आहे.......!
असो.
बाकी पुण्यनगरीला कोणाची दृष्ट लागली आहे ? आलेल्या तापाच्या साथीने जपावे.
लो भ असावा ही विनंती.
` ख़लिश '- विठ्ठल घारपुरे/१४-०८-२००९.