फुलानां स्वप्नात ही काटे बोचले .....

गझल :

फुलानां स्वप्नात ही काटे बोचले
तरी त्यानी हाल हे सारे सोसले....१.

कधी त्यानां बुलबुलानी सोबत दिली
तसे फांसे पारधी का हे पोचले ?....२.

जरासा हा गार वारा आला वनीं
निखारे घेऊन का सारे पोचले ?....३.

कसे आले आज माझे सारे सखे ?
निरोपाच्या ही बघा आधी पोचले !....४.

जरी त्याने हात माझा कुरवाळला
` ख़लिश ' माला चार काटे से बोचले !....५.

` ख़लिश ' - विठ्ठल घारपुरे / २८-०७-२००९.

गझल: