मन्मना...!
कधी जाणता.. अजाणता तुलाच होती यातना,
मन्मना..मन्मना,समजून घे रे जीवना...//ध्रु//
चेहर्यांच्या सागरात मन चेहरा तोच शोधीते,
निष्पाप एका चेहर्यावर सर्वस्व वेडे जुंपीते...
पट तोच डाव नवा प्राक्तनाशी सामना...//१//
स्मरती अनेक वचने दिली ओल्या पापण्यांनी,
सारून काटे मागे वार केले पाकळ्यांनी...
जखमा पुन्हा नव्याने साद देती या मना.....//२//
नकळत मेघ किती आकाशात वर्षिले,
हरवून अस्तित्व माझे अद्रुश्याला स्पर्शिले...
प्रत्येक क्षणास केली आसवांची याचना.....//३//
तरी मन नदीसम खळाळून वाहते,
विसरून अक्षम्य सारे तुझीच वाट पाहते...
स्थिर गूढ डोहात अव्यक्त खोल भावना.....//४//
गझल: